💥परभणी जिल्ह्यात आज शनिवारी १०३३ व्यक्ती यशस्वी औषधोपचारा नंतर झाले कोरोनामुक्त....!


💥जिल्ह्यात आज नव्याने आढळले ४३६ कोरोनाबाधित रुग्ण तर रुग्णालयात उपचारा दरम्यान ९ कोरोनाबाधीतांचा मृत्यू💥

परभणी (दि.८ मे २०२१) - जिल्ह्यात आज शनिवार दि.८ मे २०२१ रोजी ४३६ कोरोनाबाधीत आढळले तर रुग्णालयात उपचारा दरम्यान ९ कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला तर आरोग्य प्रशासनातील आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केलेल्या यशस्वी औषधोपचारानंतर तब्बल १०३३ व्यक्तीं कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी दिल्याची माहिती जिल्हा शासकीय रुग्णालय प्रशासनाकडून प्रसिध्दीपत्रकाव्दारे देण्यात आली आहे.

जिल्हा शासकीय रुग्णालयातील कोविड कक्षात ७ हजार १५७ कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत तर आजपर्यंत १ हजार १५ कोरोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर जिल्ह्यात आजपर्यंत ४२ हजार ५०८ कोरोनाबाधित व्यक्ती आढळल्या आहेत. त्यापैकी ३४ हजार ३३७ व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या आहेत. रुग्णालयातर्फे आतापर्यंत २ लाख ६१ हजार ८०० व्यक्तींचे नमुने तपासण्यात आले. त्यात २ लाख १९ हजार १९० व्यक्तींचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. तर ४१ हजार ४१७ व्यक्तींचे नमुने पॉझिटिव्ह,१०५३ अनिर्णायक व १४० नमुने नाकारल्या गेले असल्याचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.बाळासाहेब नागरगोजे यांनी प्रसिध्द केलेल्या प्रेसनोटद्वारे कळविले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या