💥राज्यांसह केंद्र शासित प्रदेशांना पुढील तीन दिवसांत ५१ लाख कोरोना प्रतिबंधक लस मात्रा देण्यात येणार....!


💥केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली माहिती,रशियाच्या स्पुटनिक व्ही लशीचा दुसरा साठा भारतात दाखल💥

नवी दिल्ली : राज्ये व केंद्र शासित प्रदेशांना पुढील तीन दिवसांत ५१ लाख लस मात्रा देण्यात येणार असून त्यांच्याकडे अजून १.८४ कोटी मात्रा शिल्लक आहेत असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे केंद्र सरकारने आतापर्यंत २० कोटी लसमात्रा राज्यांना मोफत पुरवल्या आहेत एकूण पुरवलेल्या लसमात्रांची संख्या २० कोटी २८ लाख ९ हजार २५० अशी आहे १४ मे रोजी वाया गेलेली लस वगळता १८ कोटी ४३ लाख ६७ हजार ७७२ लस मात्रा वापरण्यात आल्या आहेत अजून १ कोटी ८४ लाख ४१ हजार ४७८ लस मात्रा राज्यांकडे शिल्लक आहेत. 

काही राज्यांकडे ऋण शिल्लक दाखवत असून पुरवलेल्या लशींपेक्षा वापर जास्त आहे यातील काही लशी लष्करी दलांसाठी पुरवण्यात आल्या होत्या पुढील तीन दिवसांत ५० लाख ९१ हजार ६४० लशीच्या मात्रा राज्ये व केंद्र शासित प्रदेशांना दिल्या जाणार आहेत चाचणी करा,संपर्क शोधा,उपचार करा व कोविड सुसंगत वर्तन ठेवा या मुद्दय़ांवर भर देण्यात येत असला तरी कोविड नियंत्रणात लसीकरण हा प्रमुख टप्पा आहे.

केंद्र सरकारने देशव्यापी लसीकरण मोहीम सुरू केली असून राज्ये व केंद्र शासित प्रदेशांना मोफत लस दिली जात आहे मुक्त व वेगवान अशा पद्धतीने १ मे पासून लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू झाला सरकारने १८ वर्षांवरील व्यक्तींना लस देण्याचे जाहीर केले केंद्रीय औषध प्रयोगशाळेने प्रमाणित केलेल्या लशींपैकी पन्नास टक्के लशी या केंद्राने खरेदी केल्या आहेत त्या मात्रा राज्यांना आधी मोफत उपलब्ध करण्यात येत होत्या रशियाच्या स्पुटनिक व्ही लशीचा दुसरा साठा भारतात दाखल झाला असून १ मे रोजी पहिला साठा दाखल झाला होता...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या