💥चिखली येथील केमिस्ट संघटनेचे सचिव अनिल नावंदर यांच्या वाढदिवसा निमित्त रुग्णांना मास्क सॅनिटायझर वाटप...!


💥डॉ.नन्दकिशोर जाधव यांच्या विघ्नहर्ता डेंटल क्लिनिकमध्ये येणाऱ्या रुग्णांना करण्यात आले मास्क सॅनिटायझर वाटप💥 

✍️मोहन चौकेकर 

चिखली - सर्वत्र कोरोनाचा हाहाकार माजला असून जिवाची पर्वा न करता सँम्पूर्ण देशातील केमिस्ट बांधव आपल्या मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यातील केमिस्ट कोहिनुर एम.एस.सि.डी.ए.चे मानद सचिव अनिलभाऊ नावदंर यांच्या नेतृत्वात दिवसरात्र एक करून सेवा देण्याचे काम करत आहेत व आज त्यांचा वाढदिवस असल्याने त्यानिमित्ताने चिखली येथील डॉ.नन्दकिशोर जाधव यांच्या विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी डेंटल क्लिनिक चिखली येथे येणाऱ्या रुघ्नांना बुलढाणा जिल्हा केमिस्ट संघटनेचे सहसचिव प्रशांत ढोरे पाटील यांच्या रुद्राक्ष मेडिकोज वरून मास्क व सॅनिटायझर वाटप करण्यात आले.

अनिलभाऊ नावदंर हे जिल्ह्यासह महाराष्ट्रच नव्हे तर देशातील केमिस्ट बांधवांच समर्थ पणे नेतृत्व करत आहेत व एक आभ्यासु व्यक्तिमत्त्व आपल्या जिल्ह्यासाठी अभिमानास्पद असून देशाच्या काण्याकोपऱ्यात कुठेही जिल्ह्यातील रुघ्न असो त्याला तातडीने मदत करण्यासाठी अनिलभाऊ सदैव तत्पर असतात अश्यातच त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून चिखली येथे विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी डेंटल क्लिनिक येथे येणाऱ्या रुघ्नांना बुलढाणा जिल्हा केमिस्ट संघटनेचे सहसचिव प्रशांत ढोरे पाटील,विघ्नहर्ता डेंटल क्लिनिकचे संचालक डॉ नन्दकिशोर जाधव,भाजपा युवा मोर्चाचे चिखली तालुका अध्यक्ष संतोष काळे पाटील,चिखली केमिस्ट संघटनेचे शहराध्यक्ष स्वप्नील तायडे,रुद्राक्ष पाटील यांच्या हस्ते मास्क व सॅनिटायझर वाटप करण्यात आले...

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या