💥मनपाने नियमबाह्य पद्धतीने थांबवलेली कंत्राटी भरतीची अर्ज स्विकृती प्रकिया जाहिरातीत दिलेल्या तारखेप्रमाणे सुरु ठेवा...!


💥प्रहार जनशक्ती पक्षाची मनपा आयुक्तांकडे मागणी💥

परमणी - शहर महानगरपालिकेच्या वतीने महानगरपालिका कार्यक्षेत्राकरीता कोविड या रोगाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना अंमलबजावणीच्या अनुषंगाने १२८ विविध प्रकारच्या आरोग्य विषयक कर्मचार्यांची तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी पध्दतीने तीन महिने मानधन तत्वावर पदे भरण्याकरीता विविध वर्तमान पत्रामध्ये व महानगरपालिकेच्या वेबसाईडवर जाहिरात देऊन इच्छुक उमेदवारांना दि.२९/०४/२०२१ ते १५/०५/२०२१ या कालावधीत दोन फोटो मुळ शक्षणिक कागदपत्रासह त्यांच्या साक्षांकित प्रतीसह परभणी शहर महानगरपालिका येथे आरोग्य विभागात इच्छुक उमेवादारांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून सदर पदासाठी प्रत्यक्ष मुलाखती देण्यासंदर्भात जाहिरातीद्वारे सुचित करण्यात आले होते. 


या कंत्राटी भरतीस जिल्हयातील शहरी व ग्रामीण भागातील अनेक बेरोजगार शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांनी अर्ज दाखल करण्याची तयारी केली व त्यास चांगला प्रतिसादही मिळत होता परंतु काल दि.०७/०५/२०२१ रोजी परभणी महानगरपालिकेच्या वतीने महानगरपालिका कार्यालया बाहेर एक नोटीस लावुन दि.०७/०५/२०२१ रोजी पासुन अर्ज स्विकारणे व प्रत्यक्ष मुलाखती अचानक बंद केल्या यासाठी मोठ्या प्रमाणावर इच्छुक उमेदवारांनी अर्ज केल्याचे व मुलाखतीस हजर राहण्याचे कारण देण्यात आले आहे हे कारण हश्यास्पद आहे. महानगरपालिका प्रशासनाच्या गालथान कारभाराचा हा एक नमुना आहे. भरती प्रक्रियेची जाहिरात देत असताना सर्वांगीण विचार करुन जाहिरात देणे अपेक्षित होते. भरती प्रक्रियेत किती अर्ज येतील याचा अंदाज महानगरपालिकेला न येणे हे अत्यंत दुर्दैवी व न पटण्यासारखे आहे. जाहिरातीमध्ये अर्ज करण्याची तारीख जाहिर केलेली असताना अचानक अर्ज स्विकारण्यास नकार देणे हे बेकायरेदीशर असुन भरती प्रक्रियेचे उल्लंघन करणारे आहे व हे अत्यंत चुकीचे असुन भरती प्रक्रियेमध्ये सावळा गोंधळ होत असल्याचे सिद्ध करणारे आहे, या मागे ठराविक व मर्जीतील उमेदवारांना स्थान देण्याबाबत षडयंत्र असण्याची दाट शक्यता आहे . कोवीड संक्रमण काळामध्ये उमेदवारांना थेड मुलाखतीसाठी बोलविताना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीची परवानगी घेतली होती काय..? शिवाय कोणाच्या परवानगीने कोविड संक्रमण काळामध्ये थेट मुलाखत प्रक्रिया राबवून लोकडाऊन प्रक्रियेचे उल्लघंन करण्यात आले..? याला जबाबदार कोण..? असे प्रश्न उपस्थित राहतात.


महानगर पालिकेच्या या गलथान कारभाराबाबत उमेदवारांमध्ये नाराजी आहे या मुळे आज प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांनी श्री.दिपक मुगळीकर, जिल्हाधिकारी परभणी यांची भेट घेऊन त्यांना वरील सर्व घटनाक्रम सांगण्यात आला व एक निवेदन देण्यात आले.परभणी शहर महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येणारी कंत्राटी भरती बाबत अर्ज स्विकारणे हे जाहिरातीमध्ये दिल्याप्रमाणेच दि.१५/०५/२०२५ पर्यंत सुरु ठेवावी व ग्रामीण भागातुन येणाऱ्या बेरोजगार तरुणांची थट्टा थांबवून परभणी शहर महानगरपालिका प्रशासनास तात्काळ आदेशित करुन जाहिरातीमध्ये दिलेल्या तारखेपर्यंत म्हणजेच दि . १५/०५/२०२१ पर्यंत भरती प्रक्रिया पारदर्शक पध्दतीने पार पाडावी व असे न झाल्यास प्रहार जनशक्ती पक्ष परभणी शहर महानगरपालिका प्रशासन विरोधात तिव्र आंदोलन करेल असे ही या निवेदनात म्हंटले आहे.


निवेदनावर प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने, युवा आघाडी जिल्हा प्रमुख गजानन चोपडे, शहर प्रमुख पिंटू कदम यांच्या स्वाक्षऱ्या आहेत...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या