💥वाशिम जिल्ह्यातील शेलुबाजार जवळील येडशीत तलावात बुडून इसमाचा मृत्यू....!


💥साळुंकाबाई राऊत महाविद्यालय रासेयो आपत्ती व्यवस्थापन बचाव पथक वनोजाच्या सदस्यांनी अवघ्या १ तासात घेतला शोध💥

वाशिम:- शेलुबाजार जवळील येडशी कुंड येथील नरेश विठ्ठल कांबळे वय ( ३८ ) हे गावाजवळील गाव तलावात पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाले. तलाव खोल असल्याने व पाणी गढूळ व गाळ असल्याने त्यांचे शव स्थानिकांना मिळत नव्हते त्यानंतर येडशी येथील पोलीस पाटील गणेश बारड यांनी वनोजा येथील साळुंकाबाई राऊत महाविद्यालय वनोजा रासेयो च्या आपत्ति व्यवस्थापन बचाव पथकला पाचारण केले. 

         पथकाचे सदस्य तत्काळ साहित्यासोबत घटनास्थळी दाखल झाले. व स्थानिकांना सोबत घेऊन विशेष रेस्क्यू आॅपरेशन राबविले. पाणी गढूळ असल्याने व खोल असल्याने तसेच गाळ भरपुर असल्याने आॅपरेशन मध्ये व्यत्यय येत होते. यावेळी अवघ्या एका तासात च २० फुट खोल गढूळ पाण्यात गाळात फसलेल्या मृत नरेश कांबळे यांचा पथकाच्या सदस्यांनी  स्थानिकांच्या मदतीने शोध घेतला, व वर काढले. यानंतर पोलिस प्रशासनाचे रितसर पंचनामा करून शव, शवविच्छेदनासाठी रवाना केले. यावेळी पोलीस पाटील, सरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष यांची उपस्थिती होती. सदर रेस्क्यू आॅपरेशन राबविण्यासाठी पथकाचे राहुल साखरे, अमर खडसे, ओम वानखडे, सतिष गावंडे, सौरव इंगोले, प्रदिप सावळे, आदित्य इंगोले यांचे मोलाचे सहकार्य मिळाले.


प्रतिनिधी-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या