💥पुर्णा तालुक्यातील पिंपळगाव लिखा गावात कोविड-१९ लसीकरणास सुरुवात...!


💥संरपंच नागनाथ मोरे उपसरपंच ज्ञानोबा किरगे यांच्या उपस्थितीत २५० जनांनी घेतली कोरोना प्रतिबंधक लस💥 

पुर्णा (दि.६ मे २०२१) तालुक्यातील पिंपळगाव लिखा गावात आज गुरुवार दि.६ मे २०२१ रोजी कोरोना प्रतिबंधक लसिकरणास सुरुवात करण्यात आली यावेळी पिंपळगाव लिखा ग्रामपंचायतचे संरपंच नागनाथ मोरे उपसरपंच ज्ञानोबा किरगे यांच्या उपस्थितीत गावातील एकुण २५० जनांनी कोरोनाची लस घेतली या लसीकरण मोहिमे वेळी माजी सरपंच आंनद जोगदंड राजु मोरे गोविंद मोरे धंनजय मोरे ज्ञानोबा मोरे या सर्वांनी पुढाकार घेऊन गावातील लोकांना लस घेण्यासाठी प्रोत्साहित केले यावेळी वैद्यकीय अधिकारी गावातील सर्व अंगणवाडी सेविका तसेच मदतनिस ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

गावातील प्रत्येक नागरिकाला डोस देण्यात येईल अशा निर्धार सरपंच नागनाथ मोरे व उपसरपंच ज्ञानोबा किरगे यांनी बोलून दाखवला कोरोना प्रतिबंधक लसींचा कितीही टूडवडा असला तरी गावातील प्रत्येक नागरिकाला लस मिळावी याकरिता प्रयत्नशील राहाणार असल्याचा दृढनिर्धार संरपंच व उपसरपंच यांनी मत व्यक्त केला....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या