💥परभणी जिल्ह्यात आज बुधवार दि.१२ मे रोजी आढळले ४५३ कोरोनाबाधीत रुग्ण...!


💥जिल्ह्यात आज उपचारा दरम्यान २२ कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू 💥

परभणी (दि.१२ मे २०२१) - परभणी जिल्हा प्रशासन व जिल्ह्यातील आरोग्य प्रशासनाच्या संतर्कतेमुळे जिल्ह्यात कोरोनाबाधीत रुग्ण आरोग्य तज्ञांकडून यशस्वी औषधोपचारा नंतर कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण सातत्याने वाढतांना दिसत असून आज बुधवार दि.१२ मे २०२१ रोजी जिल्हा शासकीय रुग्णालयात औषधोपचार घेऊन पुर्णपणे बरे झालेल्या १०७२ रुग्णांना रुग्णालय प्रशासनाने सुट्टी दिली असून जिल्ह्यात आज बुधवारी रुग्णालयात उपचारा दरम्यान २२ कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला तर जिल्ह्यात आज बुधवारी नव्याने ४५३ कोरोनाबाधीत रुग्ण आढळले असून सद्या शासकीय रुग्णालयात ४७०३ कोरोनाबाधीत रुग्ण उपचार घेत असल्याचे जिल्हा शासकीय रुग्णालय प्रशासनाने एका प्रेसनोट द्वारे कळवले आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या