💥महाराष्ट्र राज्यात आज ३४ हजार नवे करोना बाधित; मृतांचा 'हा' आकडा भीतीदायक....!


💥गेल्या २४ तासांत राज्यात ३४ हजार ८४८ नवीन रुग्णांचे निदान झाले💥

मुंबई: राज्यात करोनाचा ग्राफ वेगाने खाली येत आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ३४ हजार ८४८ नवीन रुग्णांचे निदान झाले असून दैनंदिन रुग्णसंख्येचा हा आणखी एक निचांक ठरला आहे. दरम्यान, मृत्यूंचा वाढता आकडा ही चिंतेची बाब बनली असून आज एकाच दिवशी ९६० करोना बाधितांचा मृत्यू झाल्याने आरोग्य यंत्रणा हादरली आहे. 

 राज्यात गेल्या काही दिवसांपासून नवीन बाधितांचा आकडा वेगाने खाली येताना दिसत आहे. एप्रिल महिन्यात दैनंदिन नवीन रुग्णांची संख्या ७० हजारांच्या घरात पोहचली होती. त्यात मे महिन्यात सातत्याने घसरण पाहायला मिळाली आहे. गेले काही दिवस ४० हजारांच्या आसपास नवीन बाधितांचा आकडा आहे. आज त्यात नवा निचांक नोंदवला गेला आहे. त्याचवेळी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वेगाने वाढत असून आजच्या नोंदीनुसार हे प्रमाण ८९ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. करोनाची आजची आकडेवारी - राज्यात आज ९६० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. - राज्यातील करोना मृत्यूदर सध्या १.५१ टक्के एवढा आहे. - आज राज्यात ३४ हजार ८४८ नवीन रुग्णांचे निदान. - दिवसभरात ५९ हजार ७३ रुग्ण बरे होऊन परतले घरी. - आजपर्यंत एकूण ४७ लाख ६७ हजार ५३ रुग्णांची करोनावर मात. - राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८९.२ % एवढे झाले. - आजपर्यंत ३ कोटी ८ लाख ३९ हजार ४०४ करोना चाचण्या पूर्ण. - एकूण नमुन्यांपैकी ५३ लाख ४४ हजार ६३ (१७.३३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह. - सध्या राज्यात ३४ लाख ४७ हजार ६५३ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत. - २८ हजार ७२७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या पाच लाखांच्या खाली राज्यातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या पाच लाखांच्या खाली आली आहे. सध्या राज्यात ४ लाख ९४ हजार ३२ रुग्ण उपचार घेत आहेत. त्यात सर्वाधिक ९३ हजार २४५ रुग्ण जिल्ह्यात आहेत. त्यानंतर नागपूर जिल्ह्यात ३६ हजार ५६०, पालिका क्षेत्रात ३४ हजार ८३, जिल्ह्यात ३० हजार २२१ तर जिल्ह्यात २९ हजार ६५४ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या