🩸जय माता दि परिवारातर्फे आयोजित रक्तदान शिबीरात विक्रमी रक्तदान...!


🩸 रक्तदान शिबीरात तब्बल 105 रक्तदात्यांनी केले रक्तदान🩸 

✍️  मोहन चौकेकर

चिखली  : स्थानिक जय माता दी मित्र परिवाराच्या आवाहनाला प्रचंड प्रतिसाद देत आज दि.03 मे रोजी 105 रक्तदात्यांनी रक्तदान करून श्रेष्ठ दान म्हणत विक्रमी रक्तदान झाल्याची नोंद शहरात झाली असून या रक्तदान शिबिराचे संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात कौतुक होत आहे.


कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे आणि भविष्यात रक्ताचा होणारा तुडवडा  लक्षात घेता जय माता दि मित्र परिवाराचे सर्वेसर्वा गजुभाऊ तारू यांनी दि.3 मे रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. त्यांच्या आवाहनाला युवकांनी प्रचंड प्रमाणात प्रतिसाद देत आज तब्बल 105 रक्तदात्यांनी रक्तदान केले. विशेष म्हणजे या रक्तदान शिबिरामध्ये सौ.रुपालीताई संतोष तारू यांनी रक्तदान करण्यासाठी सोमवारचा उपवास सोडला.  या रक्तदान शिबिराला आमदार सौ.श्वेताताई महाले पाटील, माजी आमदार राहुल बोन्द्रे,युवा नेते शिवराज पाटील, रोहित खेडेकर,सुरेंद्र ठाकुर ,तुषार बोद्रे, दीपक वाघ, राम सुरडकर,मुकेश पडघान, ऋतिक बिहाडे, शेख जाफर शेख आसिफ, स्वप्नील पाटील,गजू मदन पाटील,संतोष तारू,राजू कऱ्हाडे,मयूर गीते, चैतन्य जोशी, धनंजय जठाले, पवन सुरडकर, तेजराव वीर,शेषराव सुरडकर, देवानंद वाघ,शेख यासिन शेख मुजीप, पवन चोपडा, रोहित ठाकूर आदींनी  भेटी देऊन रक्तदात्यांचे कौतुक केले. कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करीत 105 रक्तदात्यांनी  रक्तदान करून विक्रमी अशी नोंद  चिखली शहरात केली आहे.त्यामुळे संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात जय माता दि परिवाराचे व रक्तदात्यांचे कौतुक होत असून याबद्दल जय माता दि परिवारातर्फे अध्यक्ष गजूभाऊ तारू यांनी रक्तदात्यांचे मनःपूर्वक आभार मानले आहे...                                

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या