💥नांदेड जिल्ह्यात आज रविवारी आढळले नव्याने ३३७ कोरोनाबाधीत रुग्ण...!


💥जिल्ह्यात आज १९ कोरोनाबाधीत रुग्णांचा रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू💥

नांदेड (दि. ९ मे २०२१) - जिल्ह्यात आज रविवार दि.९ मे २०२१ रोजी सायं. ६:२० वाजेच्या सुमारास प्राप्त अहवालानुसर जिल्ह्यात नव्याने ३३७ कोरोनाबाधीत रुग्ण आढळले असून जिल्ह्यात आज रुग्णालयात उपचारा दरम्यान १९ कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आज रविवारी सायंकाळी ६-२० वाजेच्या सुमारास प्राप्त झालेले अहवाल १८५० असून ज्यात ३३७ पॉझिटिव्ह असून यात नांदेड मनपा हद्दीतील रुग्णसंख्या १२३ तर नांदेड ग्रामीण भागातील रुग्णसंख्या १९५ असून बाहेरील जिल्ह्यातील रुग्णसंख्या १९ इतकी आहे यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे बाधित अहवाल २४८ तर अँटीजन तपासणीद्वारे बाधित अहवाल ८९ आहेत जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ८४९६१ इतका आहे जिल्ह्यात आज रविवारी रुग्णालयात औषधोपचार घेऊन बरे झालेली रुग्णसंख्या ७१५ आहे तर जिल्ह्यात आजपर्यंत एकूण बरे झालेली रुग्णसंख्या ७७६५९ येवढी आहे जिल्ह्यात आजपर्यंत एकूण १७१५ रुग्णांचा कोरोनामुळे  मृत्यू झाला आहे...

 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या