💥अरें असुरी सुडसम्राटांनों......!💥...अन् संधीसाधू गिधाडांना का देताय..रे..संधी तुमच्या मृतदेहाचे लचके तोडून खाण्याची..?

✍️रचना - रणजीत सी.(चौधरी दिनेश)

 अरे असुरी सुडसम्राटांनो कोरोना महामारीच्या या भयावह परिस्थितीत कदाचित् जगलो वाचलो तर उगवूत..रे आपण सुड द्वेषापोटी एकमेकांचा पण ही वेळ नाही..रे सुड उगवण्याची ? टपलेत..रे संधीसाधू गिधाड मढ्याच्या टाळू वरच लोणी खाण्या..अरे वेळ आहे ही कोरोना महामारीच्या दाढेतून एकमेकांना वाचवण्याची...!

अरें..नाही सुटणार त्या नरबळी मागणाऱ्या अदृश्य विषाणूंच्या दाढेतून कुणी ? 'आज त्यांची तर उद्या आमची' प्रत्येकावर वेळ येणारच..रे मृत्यूच्या जबड्यात जाण्याची...!

 अरे असुरी सुडसम्राटांनो कोरोना महामारीच्या या भयावह परिस्थितीत कदाचित्  जगलो वाचलो तर उगवूत..रे आपण सुड द्वेषापोटी एकमेकांचा पण ही वेळ नाही..रे सुड उगवण्याची ? अरें..कसली संपत्ती अन् कसली ती पद-प्रतिष्ठा वेळ आलीय..रे आता अंतसंस्कारही नातेवाईकांना अॉनलाईन पाहण्याची ? 

अरे...औषधी साठ्यांसह मानवी अवयवांचाही होतोय काळाबाजार...भ्रष्टाचारी राक्षसी प्रवृत्तीच्या शस्त्राची पाजळतेय..रे मानवी देहावर धार ? अरे...हा कसला कोरोना एकीकडे गोरगरीब रोजमजूरांची पोटाची खळगी भरण्यासाठी धडपड तर एकीकडे भ्रष्ट बांडगुळ शोधताय स्वार्थाची भाकरी शेकण्यास जळत्या चितांचा आधार..!

 ना नातेवाईक..ना खांदेकरी वाट पाहणार नाही कुणी मडक धरणाऱ्या पुत्राच्या अन् पदराने वार घालणाऱ्या पुत्रीच्या येण्याची ? अंतसंस्कारासाठी वाट पाहावी लागणार एखाद्या सच्च्या गुरसिख देवदूताची...अशी ही भयावह वेळ आलीय..रे आता शेवटी बेवारस म्हणून एकटच तर सरनावर जळून जाण्याची..अन् संधीसाधू गिधाडांना का देताय..रे संधी.. तुमच्या मृतदेहाचे लचके तोडून खाण्यापरी पैसे कमावण्याची..!

✍️रचना - रणजीत सी.(चौधरी दिनेश)


टिप - कृपया कॉफी करू नका आपण वाचा आणि इतरांनाही पाठवा]  


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या