💥अवघ्या महाराष्ट्रचे लक्ष असलेल्या मराठा आरक्षणाबाबत उद्या बुधवारी सुप्रीम कोर्ट देणार निकाल.....!


💥26 मार्च 2021 रोजी सुप्रीम कोर्टाने निकाल राखून ठेवला होता💥

 ✍️मोहन चौकेकर 

मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाला आव्हान देणाऱ्या मराठा आरक्षणाच्या याचिकेवर बुधवारी सुप्रीम कोर्ट निर्णय देणार आहे सकाळी 10.30 च्या सुमारास मराठा आरक्षण प्रकरणी राखीव असलेला निकाल सुनावणार आहे.

मराठा समाजाला शैक्षणिक आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्याबाबत बुधवारी सुप्रीम कोर्ट काय निर्णय देणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं आहे या प्रकरणी न्या.अशोक भूषण यांच्या अध्यक्षतेखाली 5 न्यायाधीशांचे घटनापीठ निकाल सुनावणार आहे. 26 मार्च रोजी सुप्रीम कोर्टाने निकाल राखून ठेवला होता....

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या