💥औरंगाबाद येथील एमजीएम विद्यापीठाच्या जैव तंत्रज्ञान आणि जैवविज्ञान विभागात शॉर्ट सर्किटमुळे लागली आग....!


💥मात्र यंत्रसामग्री,उपकरणे जळून सुमारे 3 कोटी रुपयांचे नुकसान💥

औरंगाबाद : एमजीएम विद्यापीठाच्या जैव तंत्रज्ञान आणि जैववविज्ञान (बायोटेक्नालॉजी आणि बायोसायन्स) विभागात रविवारी दि. 2 मे रोजी  सकाळी शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. मात्र यंत्रसामग्री, उपकरणे जळून सुमारे 3 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. 

जेएनईसीच्या इमारतीत तिसऱ्या मजल्यावर हे जैव तंत्रज्ञान आणि जैववविज्ञान विभाग असून रविवारी दि. 2 मे रोजी  सकाळी 6 वाजेच्या सुमारास या ठिकाणी आग लागल्याचे सुरक्षा रक्षकांच्या लक्षात आले. त्यानंतर लागलीच अग्निशामक दलाला आगीची कल्पना देण्यात आली. दरम्यान, सुरक्षा रक्षक तसेच एमजीएम फायर सेफ्टी विभागाच्या वतीने आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न करण्यात आले. आगीने केमिकल विभागाची एक खोली पूर्णपणे कवेत घेतली होती. तर, त्या मजल्यावरील 20 खोल्यांना आगीच्या झळा पोहोचल्या. सुमारे दोन तासांच्या प्रयत्नानंतर ही आग पूर्णपणे आटोक्यात आली. मात्र, त्यापूर्वी विभागातील कार्यालयीन दस्तावेज, फर्निचर, प्रयोगशाळेसाठी लागणारी काचेची तसेच प्लास्टिकची उपकरणे, यंत्रसामग्री तसेच अन्य काही साहित्यही जळून खाक झाली. सुदैवाने या आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. मात्र, सुमारे 3 कोटी रुपयांचे नुकसान झाले, अशी माहिती एमजीएम विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. आशिष गाडेकर यांनी दिली आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या