💥परभणी जिल्ह्यात सर्वत्र प्रशासकीय निर्देशांची पालन करीत मुस्लीम बांधवांनी साधेपणाने केली 'रमजान ईद' साजरी...!


💥कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुस्लीम बांधवांनी सर्व धार्मिक कार्यक्रम आपआपल्या घरातूनच साजरे केले💥

परभणी (दि.१४ मे २०२१) - परभणी जिल्ह्यात कोरोना महामारीच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारने 'ब्रेक द चेन' या मोहिमेतून कडक निर्बंध लागू केल्याने जिल्ह्यातील मुस्लिम बांधवांनी प्रशासकीय निर्देशांचे पालन करीत आज शुक्रवार दि.१४ मे २०२१ रोजी पवित्र रमजान ईद अत्यंत साधेपणाने साजरी केली मुस्लीम बांधवांनी रमजान ईद निमित्त नियमित नमाज पठण,तरावीह तसेच ईफ्तारसाठी मशीदींमधून अथवा सार्वजनिक ठिकाणी एकत्र ऐण्याऐवजी सर्व धार्मिक कार्यक्रम आपआपल्या घरातूनच साजरे केले.

परभणी शहरासह जिल्ह्यातील पुर्णा,पालम,गंगाखेड,सोनपेठ,सेलू,मानवत आदी तालुक्यातही ईदच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासनाने जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदी-विक्री करीता गेल्या चार दिवसात सकाळी ७-०० ते दुपारी २-०० वाजेपर्यंत मूभा बहाल केली. त्यामुळे मुस्लिम समाजबांधवांना फळ-फळावळ, ड्रायफ्रुट्स,भाजीपाला, दूध व दुग्धजन्य पदार्थ तसेच किराणा सामान वगैरे जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीकरिता मोठी सोय झाली. या चार दिवसात त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांवर रेलचेल राहीली. ईदच्या पार्श्‍वभूमीवर अन्य काही दुकानदारांनी प्रशासनाचे सोयीस्कर दुर्लक्ष ओळखून आप-आपली दुकाने ग्राहकांना खरेदीकरिता खुली ठेवली होती, त्यामुळे गुरुवारी रात्री काही भागात अन्य वस्तूंच्या खरेदी-विक्री करीता बर्‍यापैकी वर्दळ सुरु होती. शुक्रवारी सकाळी मुस्लिम समाजबांधवांनी आप-आपल्या घरांमधूनच सर्व धार्मिक विधी पार पाडीत कुटूंबियांना, नातेवाईकांना, मित्र परिवारांस शुभेच्छा दिल्या....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या