💥पुण्याचे महापौर मोहोळ यांनी प्रत्यक्षात आणि मे.कोर्टात सादर केलेली आकडेवारी वेगळी असल्याचा केला गंभीर आरोप....!


💥पुण्यात गेल्या १५ दिवसांत रुग्णसंख्या १६ हजारांनी कमी झाली आहे💥 

मे.मुंबई हायकोर्टाने पुण्यातील वाढत्या रुग्णसंख्येवर चिंता व्यक्त केली असून पुणे तसंच रुग्णसंख्या जास्त असणाऱ्या इतर शहरांमध्ये लॉकडाउन लावण्याची सूचना  मुख्यमंत्र्यांना केली यावेळी मे.मुंबई हायकोर्टाने पुणे महापालिकेचे आयुक्त मुंबई पालिकेच्या आयुक्तांशी बोलत का नाहीत ? असा प्रश्नही विचारला यावेळी मे.कोर्टाने मुंबई मॉडेल इतर पालिकांनीही स्वीकारले पाहिजेत असा सल्ला दिला. 

दरम्यान पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी प्रत्यक्षात आणि मे.कोर्टात सादर केलेली आकडेवारी वेगळी असल्याचा गंभीर आरोप ए.बी.पी. माझाशी बोलताना केला आहे “वस्तुस्थिती वेगळी असून मे.कोर्टासमोर कोणी कशी आकडेवारी दिली याची माहिती घेत आहोत प्रत्यक्षात आणि मे.कोर्टात सादर केलेली आकडेवारी वेगळी आहे. म्हणूनच आम्हाला खुलासा करणं भाग आहे,” असं ते म्हणाले आहेत. 

“पुण्यासारख्या ठिकाणी लॉकडाउन करा” मे.मुंबई हायकोर्टाची उद्धव ठाकरेंना सूचना मे.कोर्टात जी माहिती दिली जाते त्याच आधारे मे.कोर्ट आपलं म्हणणं मांडत असतं पण एक शंका आहे की, ही आकडेवारी नेमकी कधीची आहे गेले अनेक दिवस राज्य सरकारच्या आकडेवारीत विसंगती पहायला मिळत आहे पुणे शहरातील स्थिती चांगली आणि नियंत्रणात आहे,असा दावा महापौरांनी केला. 

पुण्यात गेल्या १५ दिवसांत रुग्णसंख्या १६ हजारांनी कमी झाली आहे पुण्यात १ लाखांच्या वर ॲक्टिव्ह रुग्णसंख्या असल्याचा दावा केला जात आहे पण पुण्यात सध्या फक्त ३९ हजार ॲक्टिव्ह रुग्ण आहेत कदाचित त्यामध्ये पुणे शहर, जिल्हा, पिंपरी चिंचवड यांचीही आकडेवारी असावी पण पुण्यात पॉझिटिव्हिटी, मृत्यूदर,ॲक्टिव्ह रुग्णसंख्या कमी आली आहे,” असं त्यांनी सांगितलं.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या