💥औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाबाधीतांच्या मृत्यूचा आकडा 3 हजारांवर....!


💥आज जिल्ह्यात नव्याने आढळले 530 कोरोनाबाधीत रुग्ण💥

औरंगाबाद (दि.20 मे 2021) : औरंगाबाद शहर व जिल्ह्यात कोरोनाचे 20 मे 2021 रोजी एकूण मृत्यू झालेल्यांची संख्या 3 हजारांवर पोहोचली आहे. 20 मे रोजी सायंकाळपर्यंत जिल्ह्यात कोरोनाचे एकूण 3005 मृत्यू झालेले असून 530 नव्याने बाधित रूग्ण आढळले आहेत. 

औरंगाबाद जिल्ह्यात आज 589 जणांना (मनपा 117, ग्रामीण 472) सुटी  देण्यात आली. आजपर्यंत 129878 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.सद्यस्थितीत जिल्ह्यात सक्रीय कोरोना रुग्णांचा आकडा 6260 वर पोहोचला असून 1,29,878 रुग्ण आत्तापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत. तर एकूण बाधितांचा आतापर्यतचा आकडा 1 लाख 39 हजार 143 वर पोहोचला आहे. आज जिल्ह्यातील  589 बाधित रुग्णांना डिस्चार्ज करण्यात आला. सन 2020 च्या मार्च महिन्यामध्ये औरंगाबादेत एका प्राध्यापिका महिलेला कोरोनाची बाधा झाली होती. जिल्ह्यातील ही महिला पहिलीच कोरोना बाधित रुग्ण म्हणून नोंदल्या गेली.  सुमारे 14 महिन्यांच्या कालावधीत औरंगाबाद शहरात व जिल्हाभरात आत्तापर्यंत एकूण बाधितांचा आकडा 1 लाख 39 हजारांवर पोहोचला आहे. या दरम्यान जिल्ह्यात कोरोनामुळे बळींचा आकडाही 3 हजारांच्या वर पोहोचला आहे. गेल्या काही दिवसांपासून औरंगाबादच्या बाधितांच्या संख्येत झपाट्याने घट होताना दिसत असून दररोज सुमारे पाच- सहाशेंच्या आसपास नवे रुग्ण आढळून येत आहेत.

💥शहरात 4293 नागरिकांच्या चाचण्या💥

औरंगाबाद शहरात आज  दि. 20  मे रोजी  मनपा आणि विविध केंद्रांवर एकूण 4293 नागरिकांच्या कोरोना चाचण्या घेण्यात आल्या. यामध्ये महापालिकेच्या वतीने 2767  अँटीजन चाचण्या घेण्यात आल्या. यात  41   पॉझिटिव्ह आढळले . विविध केंद्रांवर अँटीजन चाचण्यात 8 पॉझिटिव्ह आढळले . आज दिवसभरात एकूण 1526  जणांचे स्वॅब तपासण्याठी घेण्यात आले असून त्यांचा अहवाल उद्या प्राप्त होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

💥शहराचा बाधित होणारांचा दर 4.57 %💥

औरंगाबाद जिल्ह्याचा कोरोनाचा रिकव्हरी रेट 20  मे  रोजी  हे प्रमाण 95.88  %  नोंदला गेला. शहराचा कोरोनाचा मृत्यु दर 20  मे रोजी 2. 09% तर जिल्ह्याचा 2.30 % आहे. 20  मे रोजीचा कोरोनाचा शहराचा बाधित होणारांचा दर 4.57 % तर शहराचा एकूण दर 12.01 %  नोंदला गेला.

💥एंट्री पॉईंट कोरोना चाचणी 18 पॉझिटिव्ह💥

औरंगाबाद महानगर पालिकेच्या वतीने 20 मार्च 2021 पासून अन्य जिल्ह्यातून अथवा बाहेरून शहरात येणाऱ्या नागरिकांची शहरातील एंट्री पॉईंटवर अँटीजन टेस्ट करण्यात येत आहे .

आज 20 मे 2021 रोजी शहरातील 6 एंट्रीपॉईंट वर कोरोना अँटीजन चाचणी करण्यात आली.यात

1) चिकलठाणा येथे 184 पैकी 3   पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

2) हर्सूल टी पॉईंटवर 269 पैकी 07 पॉझिटिव्ह

3) कांचनवाडी येथे 330  पैकी 7  पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

4) झाल्टा फाटा येथे 197 पैकी कोणीही पॉझिटिव्ह आढळुन आले नाहीत.

5) नगर नाका येथे 338 पैकी 1 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

6) दौलताबाद टी पॉईंट येथे 228  जणांची टेस्ट करण्यात आली. यात कोणीही पॉझिटिव्ह आढळून आले नाहीत.

💥संचारबंदी काळात विनाकारण फिरणाऱ्या 494 नागरिकांची तपासणी 1 पॉझिटीव्ह💥

शासन निर्देशानुसार कोविड- 19 ब्रेक द चेन अंतर्गत महानगर पालिका हद्दीत  प्रशासक तथा आयुक्तआस्तिक कुमार पांडेय यांच्या आदेशानुसार शहरात संचारबंदी काळात महानगर पालिका व पोलीस विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने  विणाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांची अँटीजन टेस्ट करण्यात येत आहे.

शहरातील 15 पोलीस स्टेशन अंतर्गत 6 मोबाईल टीम द्वारे सकाळी 9 ते सायं. 5 व सायं. 5 ते रात्री 1 या कालावधीत  2 शिफ्ट मध्ये अँटीजन टेस्ट करण्यात येत आहे . प्रशासक तथा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांच्या आदेशानुसार व आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.  नीता पाडळकर यांच्या नेतृत्वाखाली डॉ. विशाल पट्टेकर , स्मार्ट सिटी चे सिद्धार्थ बनसोडे , आरोग्य कर्मचारी ,लॅब टेक्निशियन , डॉक्टर ,वार्ड कर्मचारी व पोलीस कर्मचारी यांचे पथक ही मोहीम राबवित आहे.

 आज   20  मे 2021 रोजी 494 नागरिकांची अँटीजन टेस्ट करण्यात आली यात 1 नागरिक पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

💥सरकारी कार्यालयात अँटीजन कोरोना चाचणी💥

शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासक तथा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांच्या निर्देशानुसार व  आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ . नीता पाडळकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील प्रमुख सरकारी  कार्यालयात  येणाऱ्या प्रत्येक अभ्यागतांची अँटीजन कोरोना चाचणी घेण्यात येत आहे. यात आज 20 मे   रोजी 

1.मनपा मुख्यालय येथे 9 जणांची  अँटीजन चाचणी घेण्यात आली.  यात कोणीही पॉझिटिव्ह आढळले नाही.

2.पोलीस आयुक्त कार्यालय येथे 13 जणांची कोरोना चाचणी घेण्यात आली . यात कोणीही  पॉझिटिव्ह आढळले नाही.

3.उच्च न्यायालय येथे 8 जणांची कोरोना चाचणी घेण्यात आली . यात कोणीही पॉझिटिव्ह आढळले नाही.

4. आरटीओ ऑफिस येथे  कोरोना चाचणी घेण्यात आली नाही.

5.जिल्हाधिकारी कार्यालय येथे  27 जणांची कोरोना चाचणी घेण्यात आली.  यात कोणीही पॉझिटिव्ह आढळले नाही.

6.विभागीय आयुक्त कार्यालय येथे 4जणांची कोरोना चाचणी घेण्यात आली.यात कोणीही पॉझिटिव्ह आढळले नाही.

💥रेल्वे स्टेशन येथे 1 प्रवासी पॉझिटिव्ह💥

औरंगाबाद महानगरपालिकेतर्फे कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाय योजना राबविण्यात येत आहेत. याच अनुषंगाने शासन निर्देशानुसार रेल्वे स्टेशन, विमानतळ येथे प्रवाशांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे .

1) रेल्वेस्टेशन येथे 20 मे  2021 रोजी 78 प्रवाशांची आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आली. 19 मे रोजी घेण्यात आलेल्या टेस्टचा रिपोर्ट 20 मे रोजी  प्राप्त झाला असुन 1  प्रवासी पॉझिटिव्ह आढळला आहे.

2) विमानतळ येथे 20 मे रोजी  2021  रोजी 21  विमान   प्रवाशांची आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आली .

💥आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे💥

मनपा (190)

औरंगाबाद 3, सातारा परिसर 1, शिवाजी नगर 3, बीड बायपास 8, गारखेडा परिसर 5, नारेगाव 2, शहागंज 2, अजब नगर 1, न्यु नंदनवन कॉलनी 1, बन्सीलाल नगर 1, चिकलठाणा 3, मिलेनिअर पार्क एमआयडीसी 2, एन-2 येथे 4, जयभवानी नगर 2, हनुमान नगर 1, परिजात नगर 3, जाधववाडी 1, लक्ष्मी कॉलनी 1, राम नगर 3, हर्सूल 3, संजय नगर 1, राज नगर 2, न्याय नगर 1, एन-4 येथे 1, पुंडलिक नगर 2, भारतमाता कॉलनी 1, जवाहर कॉलनी 2, शास्त्री नगर 1, नंदनवन कॉलनी 1, विशाल नगर 1, नवनाथ नगर 1, प्रसन्नदत्त पार्क 1, आलोक नगर 2, भावसिंगपूरा 1, पेठे नगर 2, होळकर चौक 1, एन-6 येथे 2, बजरंग चौक 1, सनी सेंटर 1, एन-8 येथे 1, एन-7 येथे 2, एन-9 येथे 4, सुरेवाडी 4, म्हसोबा नगर 1, मयुर पार्क 8, एन-3 येथे 2, वानखेडे नगर 1, जयसिंगपूरा 1, एन-12 येथे 1, घाटी परिसर 1, कैलाश नगर 1, बेगमपूरा 1, खोकडपूरा 1, बंजारा कॉलनी 1, कांचनवाडी 3, द्वारका नगर 2, गजानन मंदिर 1, पडेगाव 2, प्रताप नगर 1, होनाजी नगर 1, अब्दुल शहा नगर 1,  विश्राम कॉलनी 1, त्रिमूती चौक जवाहर कॉलनी 1, घाटी 3, अन्य 69

💥ग्रामीण (340)

बजाज नगर 10, वडगाव कोल्हाटी 6, सिडको वाळूज महानगर 2, वाळूज 2, बोकनगाव 1, पिसादेवी 1, गोळेगाव ता.खुल्तबाद 1, गेवराई 1, भारेगाव 1, वाळूज मोहटादेवी मंदिर 1, बोरगाव ता.गंगापूर 1, कन्नड 1, शेलगाव ता.कन्नड 1, अंधारी ता.सिल्लोड 1, वाघाडी ता.पैठण 1, शेंद्रा 1, तांडा बालानगर 1,  पैठण 2, वळदगाव 1, जिकठाण ता.गंगापूर 1, ममतापूर ता.गंगापूर 1, दौलताबाद 1, पिशोर ता.कन्नड 1, सिल्लोड 1, खासगाव 1, वागदी ता.पैठण 1, अनय् 297

💥मृत्यू (24) :

घाटी (14)

1.     पुरूष/46/वाळुज, औरंगाबाद.

2.     पुरुष/32/प्रणव प्लाझा, औरंगपूरा, औरंगाबाद.

3.     पुरूष/55/जैतापूर, ता.कन्नड, जि.औरंगाबाद.

4.     पुरूष/70/फुलंब्री, जि.औरंगाबाद.

5.     स्त्री/82/आवडे उंचेगाव, ता.पैठण, जि.औरंगाबाद.

6.     पुरूष/60/पिंपरी, ता.सिल्लोड, जि.औरंगाबाद.

7.     स्त्री/61/नंदनवन कॉलनी, औरंगाबाद.

8.     स्त्री/70/बिडकीन, औरंगाबाद.

9.     स्त्री/50/औरंगाबाद.

10.    स्त्री/79/गेवराई, ता.पैठण, जि.औरंगाबाद.

11.    स्त्री/55/पैठण, जि.औरंगाबाद.

12.    पुरूष/34/एन-7, सिडको, औरंगाबाद.

13.    पुरूष/50/शांडनेरवाडी, ता.सिल्लोड, जि.औरंगाबाद.

14.    स्त्री/55/छावणी, औरंगाबाद.

💥खासगी रुग्णालय (10)

1.     स्त्री/61/बोरूडी, वैजापूर

2.     स्त्री/48/दमानी खुर्द, ता. कन्नड

3.     स्त्री/30/ वाकी कदीम, ता. कन्नड

4.     पुरूष /59/ टाकळी अंबड, ता. पैठण

5.     स्त्री/35/ बाजारसावंगी, ता. खुलताबाद

6.     स्त्री/66/ शांतीपुरा- लासूरस्टेशन, ता. गंगापूर

7.     पुरूष/70/ चौराहा, औरंगाबाद

8.     पुरूष/74/ देवळाई रोड, साई नगर, औरंगाबाद

9.     पुरूष/68/एन नऊ सिडको

10.    पुरूष/66/ प्रताप नगर, औरंगाबाद


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या