💥नाशिक येथील डॉ.झाकिर हुसेन रुग्णालयात हुंदके,आक्रोश आणि हळहळ..!


💥रुग्णालयातील ऑक्सिजनचा पुरवठा अचानक बंद झाल्याने काही क्षणात होत्याचं नव्हतं झालं💥

माझ्या आईच्या प्रकृतीत सुधारणा होत होती. लवकरच तिला डिस्चार्ज मिळणार होता. मात्र नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. रुग्णालयातील ऑक्सिजनचा पुरवठा अचानक बंद झाला अन् काही क्षणात होत्याचं नव्हतं झालं. माझ्या आईचा तडफडून मृत्यू झाला. फक्त माझी आईच नाही तर संपूर्ण वॉर्डमध्ये हेच दृश्य दिसत होतं, असे आई गमावलेली एक तरुणी जिवाच्या आकांताने ओरडून झाकीर हुसेन रुग्णालयाबाहेर सांगत होती.

आपला संताप व्यक्त करताना तरुणी म्हणाली, ‘‘माझी आई दिल्लीवरून इथे इलाजासाठी आली होती. तिला वाटले माझी मुलगी माझा इलाज करेल, पण मी नाही तिला वाचवू शकले. सकाळी आईला जेवण दिले. आम्ही घरी आंघोळ करण्यासाठी गेलो. तितक्यात रुग्णालयातून आई गेल्याचा पह्न आला.’’ दुसऱया रुग्णाच्या नातेवाईकाने सांगितले, ‘‘माझ्या भावाच्या प्रकृतीत सुधारणा होत होती, पण मिनिटात खेळ संपला. संपूर्ण हॉलमध्ये आवाज व किंकाळ्या सुरू होत्या. कोणी ऑक्सिजन देण्यास तयार नव्हते. सिलिंडर संपले म्हणत होते. सर्व रिकव्हर होणारे रुग्ण होते, पण गेले.’’ दरम्यान, दोषींवर कारवाई झाली पाहिजे, अशी संतप्त मागणी मृत रुग्णांच्या नातेवाईकांनी केली आहे...


ऑक्सिजन लीक झाल्यामुळे नाशिकमधील रुग्णालयात घडलेली घटना हृदय पिळवटून टाकणारी आहे. या घटनेत अनेकांचे मृत्यू झाल्याने मन हेलावलं. दुःखाचा डोंगर कोसळलेल्या नातेवाईकांप्रति संवेदना. नरेंद्र मोदी, पंतप्रधान


नाशिक येथील डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात अतिशय दुर्दैवी घटनेत रुग्णांना प्राणांस मुकावे लागले. ही दुर्घटना सद्यस्थितीत वैद्यकीय यंत्रणेसाठी वेदनादायी आणि आव्हानं वाढवणारी आहे. मृतांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहवेदना. भावपूर्ण श्रद्धांजली. – शरद पवार, अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस


नाशिक येथील डॉ. झाकीर हुसैन रुग्णालय येथे ऑक्सिजन टाकीतून गळती होऊन काही निरपराध कोरोना रुग्ण दगावल्याचे समजून तीव्र दुŠख झाले. या दुर्दैवी घटनेत प्राण गमावलेल्या रुग्णांच्या कुटुंबीयांना आपल्या शोक संवेदना कळवतो व बाधित व्यक्तींना लवकर बरे वाटावे यासाठी प्रार्थना करतो. – भगतसिंह कोश्यारी, राज्यपाल


नाशिक येथील डॉ. झाकीर हुसैन रुग्णालयातील दुर्घटना अत्यंत दुर्दैवी आहे. आम्ही सगळेच या सर्व पुटुंबांच्या दुःखात सहभागी आहोत. पालकमंत्री छगन भुजबळ आणि सर्व अधिकारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांच्या संपर्कात आहेत. या दुर्दैवी घटनेची सखोल चौकशी केली जाईल. – आदित्य ठाकरे, पर्यावरणमंत्री


ऑक्सिजन गळतीमुळे जी घटना घडलीय त्यामुळे मन सुन्न झाले. ज्यांनी या घटनेत प्रियजन गमावले त्यांच्या या नुकसानीबद्दल मी मनापासून संवेदना व्यक्त करतो. इतर सर्व रुग्ण लवकर बरे व्हावेत यासाठी मी देवाला प्रार्थना करतो. – अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री


ऑक्सिजन लीक झाल्यामुळे अनेक रुग्णांना प्राण गमवावे लागले. ही बाब अतिशय दुर्दैवी आणि धक्कादायक आहे. या घटनेबद्दल तीव्र दुŠख व्यक्त करतो. प्रशासनाने आता तत्काळ गरजूंना मदत उपलब्ध करून देण्याचे काम केले पाहिजे. या घटनेची सखोल चौकशी तर होईलच, पण भविष्यात अन्यत्र कुठे असे घडणार नाहीत या दृष्टीने खबरदारी घेतली पाहिजे. – देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे विरोधी पक्षनेते


ऑक्सिजन गळतीमुळे नाशिक येथील रुग्णालयात निष्पाप रुग्णांना जीव गमवावा लागला. ही घटना अतिशय वेदनादायी आहे. मृतांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची श्रद्धांजली. आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण आहे पण जर कुणाकडून बेपर्वाई झाली असेल तर त्यांना सरकारकडून कडक शासन व्हायलाच हवं. – राज ठाकरे, मनसे अध्यक्ष


ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे 22 रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी पाहून फार दुःखी झालो. शोकग्रस्त कुटुंबांना हे दुःखद नुकसान सहन करण्याचे सामर्थ्य मिळावे, ही माझी मनापासून प्रार्थना आहे.- पी. चिदंबरम, काँग्रेस नेते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या