💥महाराष्ट्रातील ठाकरे सरकारचे सहा मंत्री चार महिन्यात सिबीआयच्या दारात असतील - किरीट सोमय्या


💥परमबीर सिंग,रश्मी शुक्ला,वाझे यांच्यावर दबाब आणण्याचं काम ठाकरे सरकार करत असल्याचा आरोपही सोमय्यांनी केला💥

महाराष्ट्रातील ठाकरे सरकारचे सहा मंत्री पुढील चार महिन्यात  सिबीआयच्या दारात असतील असा दावा भारतीय जनता पार्टीचे नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे किरीट सोमय्या यांनी यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना जाहीर आव्हान दिलं आहे.

भाजपा नेते किरीट सोमय्या कल्याणमध्ये पाहणी दौऱ्यासाठी आले होते यावेळी त्यांनी खासगी आणि सरकारी कोव्हिड रुग्णालयांची पाहणी केली उपाययोजना न केल्यास १२ मे नंतर करोनाचे मृत्यू प्रमाण वाढण्याची भीती यावेळी त्यांनी व्यक्त केली उद्धव ठाकरे आणि त्यांचं सरकार आता भयंकर भयभीत आहे सिबीआयने रश्मी शुक्ला यांचा जबाब घेतला आहे एफआयआर मध्ये अनिल परब यांचाही उल्लेख आला आहे म्हणूनच ठाकरे सरकारमधील सहा मंत्री सिबीआयच्या निमंत्रणाची वाट पाहत आहेत. 

परमबीर सिंग,रश्मी शुक्ला आणि सचिन वाझे यांच्यावर दबाब आणण्याचं काम ठाकरे सरकार करत आहे असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला पुढे ते म्हणाले की उद्धव ठाकरे यांना माझा थेट आव्हान आहे की, येत्या चार महिन्यात तुमच्या मंत्रिमंडळातील आणि सहयोगी सहा सहकारी जे वसुलीत सहभागी होते ते सिबीआयच्या दारात असणार असेही किरीट सोमय्यांनी म्हटले आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या