💥पुर्णा तालुक्यातील गौर येथील शेतकऱ्याने नामधारी टरबूजाचे लॉकडावुनमध्ये काढले विक्रमी उत्पादन...!


💥कोराडवाहु जमीनीत प्रथमच उपसासिंचनातुन काढले लाखोचे उत्पादन💥

 पूर्णा : तालुक्यातील गौर येथील शेतकरी जगन्नाथ मारोतराव जोगदंड यांनी  ७० दिवसात येणारे नामधारी टरबूजाचे  लॉकडावुनमध्ये काढले विक्रमी उत्पादन एक एक टरबूज तीन ते पाच किलो पर्यंत वजनाचे .....कोराडवाहु जमीनीत प्रथमच उपसासिंचनातुन काढले लाखोचे उत्पादन

        गौर येथिल जगन्नाथ मारोतराव जोगदंड यानी मागीलवर्षी मार्चमध्ये कोरोनाच्या लॉकडाउनमध्ये गोदावरीनदीवर सहा किलोमीटर अंतरावरुन पाइपलाईन करून गौर शिवारात नांदेड पूर्णा रोडवरील शेतात ६० आर जमीनीच्या क्षेत्रात संत्रा लागवड करुन अंतरपिक म्हणून नामधारी टरबूज ८ x८ फुटावर बेड टाकुन१x१ चौरस फुटावर  लागवड करुन ७० दिवसात श्रीराम कृषी केंद्र नागनाथ सोलव यांच्या मार्गदर्शनाखाली ६० टन तीन लाख रुपयाचे उत्पादन काढले आहे . लागवड ते टरबूज तोडणीपर्यंत  एक लाख रुपये खर्च झाला आहे . 


जगन्नाथ जोगदंड यांनी लॉकडाउन मध्ये पूर्णा - नांदेड रोडवर लिंबाच्या झाडाखाली प्रवाशांना कमी दरात टरबूज विक्री केले आहे . गोदावरी नदी येथून पाईपलाइन सहा किलोमीटर अंतरावरुन अनत असतांना पाच ठिकाणी जनावरांना पिण्यासाठी व गरजवंत शेतकरी बांधवाना पाणी दिले त्यांना बाजीपाला उत्पादन काढण्यासाठी मदत केली आहे . कोरडवाहु जमीन उपसासिंचनाच्या माध्यामातून केली बागायती .  संत्रा लागवड करून अंतरपिक म्हणून गोबी , टरबूज , खरबूज लागवड करून प्रथमच गौर शिवारात आदर्श निर्माण केला आहे . पुढील वर्षात शेतकरी बांधवाचा आदर्श घेत पाच तरुण टरबूज , खरबुज यामध्ये स्पर्धात्मक उत्पादन काढणार आहेत अशी माहीती जगन्नाथ जोगदंड यांनी दिल....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या