💥परभणी जिल्हा पोलिस दलात नवीन १० महिंद्रा बोलेरो बी-४, बीएस-६ चार चाकी वाहने दाखल...!


💥अतिरीक्त पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या हस्ते करण्यात आले नवीन वाहनांचे पुजन💥

परभणी (दि.१२ एप्रिल) परभणी जिल्हा पोलिस दलाच्या ताफ्यात १० नवीन अत्याधुनिक सुविधा असलेली चारचाकी वाहने आज सोमवार दि.१२ एप्रिल २०२१ रोजी दाखल झाली आहेत.

परभणी जिल्हा नियोजन समितीच्या वतीने पोलिस दला करिता डायल ११२ अंतर्गत १० नवीन चार चाकी वाहने महिंद्रा बोलेरो बी-४, बीएस-६ खरेदी करण्यात आली असून या नवीन वाहनांचे पुजन जिल्ह्याचे अतिरीक्त पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन,सहाय्यक पोलिस अधिक्षक अविनाशकुमार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पोलिस निरीक्षक सुनील ओव्हळ, मोटर परिवहन विभागातील पर्यवेक्षक सय्यद साजीद हुसेन, सहाय्यक पोलिस निरीक्षक हनुमंत पांचाळ, सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष पाटील, कर्मचारी अशोक कदम, सहाय्यक फौजदार पार्वेकर, जी.जी. पठाण, श्री.भागवत सय्यद हैदर, डी.एस. घाग, प्रशांत कुलथे, एम.एस. कार्ले, बिराजदार, अन्वर पठाण, दीपक मुंडे, नरवाडे, गणेश कौटकर, हुसेन खान आदींची उपस्थिती होती.


दरम्यान, शहरासह जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवल्यास घटनास्थळी पोलिसांना तातडीने पोचता यावे, सण - उत्सवांच्या काळात पेट्रोलिंगसाठीही अत्याधुनिक व सुसज्ज वाहनांची पोलिस दलास आवश्यकता होती प्राप्त झालेल्या वाहनांची उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात नोंदणी करण्यात येणार आहे. त्यानंतर या अत्याधुनिक वाहनांचे जिल्हा पोलिस अधीक्षक जयंत मीना यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्ह्यातील पोलिस ठाण्यांना वितरण करण्यात येणार असल्याचे समजते.

💥जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून वाहनांची खरेदी💥

जिल्हा पोलिस अधीक्षक जयंत मीना यांनी पदभार स्वीकारल्यानंतर मोटार परिवहन विभागाची आढावा बैठक घेऊन पोलिस निरीक्षक रमाकांत बनसोडे, साजीद हुसैन यांची बैठक घेऊन मोटार विभागाला आवश्यक असणार्‍या वाहनांची माहिती घेतल्यानंतर जिल्ह्याकरिता चारचाकी वाहनांची कमतरता असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पोलिस अधीक्षक श्री.मीना यांनी तातडीने वरिष्ठांशी पत्रव्यवहार करण्याबरोबरच याबाबत सातत्याने पाठपुरावा करून जिल्हा नियोजन समितीकडून 71 लाख दोन हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून घेत वाहने खरेदीसाठी प्रयत्न केले. राज्याच्या जी.एम. पोर्टलवरून रास्त कंपनीकडून बाजारपेक्षा कमी भावात एक वाहन सात लाख दहा हजार 146 रुपयांत खरेदी केल्याचे पोलिस अधीक्षक कार्यालयाने म्हटले आहे. दरम्यान, जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांना या वाहनांचे वाटप करण्याचे त्यांनी दिले असल्याचेही म्हटले आहे. नवीन दहा वाहनांमुळे परभणी पोलिस दल आणखी गतिमान होण्यास मदत होणार आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या