💥जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स - राज्यासह देशातील महत्वाच्या बातम्या...!


💥राज्यात 14 दिवसांचा कडक लॉकडाऊन हवा असं कोविड टास्क फोर्सच्या सदस्यांचं मत💥 

✍️ मोहन चौकेकर

✍️महाराष्ट्रात आठ दिवसांचा लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री ठाकरे हे लॉकडाऊन लावण्याच्या बाजूनं आहेत. तर कोरोना आटोक्यात आणायचा असेल तर राज्यात 14 दिवसांचा कडक लॉकडाऊन हवा असं कोविड टास्क फोर्सच्या सदस्यांचं मत आहे. ही बैठक अजून सुरु आहे.

✍️देशात कोरोनाचा विस्फोट, एकाच दिवशी 1 लाख 53 हजार नव्या रुग्णांची भर; गेल्या 24 तासात 839 रुग्णांनी गमावला जीव.

✍️रेमडेसिवीर इंजेक्शनची निर्यात थांबवली, केंद्राचा मोठा निर्णय; देशात कोरोनाने निर्माण झालेली स्थिती सामान्य होत नाही तोपर्यंत रेमडेसिवीरची निर्यात बंद राहणार.

✍️राज्यात कमीत कमी 15 दिवसांचा लॉकडाऊन असेल, सर्वांच्या मनाची तयारी झालीय, अंतिम निर्णय दोन ते तीन दिवसात; आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती.

✍️अँटिलिया स्फोटकं प्रकरणी सचिन वाझे यांचे सहकारी रियाझुद्दीन काझी यांना 16 एप्रिलपर्यंत NIA ची कोठडी; टीआरपी घोटाळ्यातही सचिन वाझे यांचं नाव समोर.

✍️माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या स्वीय सहाय्यकांना सीबीआयचं समन्स; देशमुखांच्याही चौकशीची शक्यता.

✍️राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा तडाखा, मुंबईतही पावसाची हजेरी; उस्मानाबादमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, शेतमालाचं मोठं नुकसान.

✍️राज ठाकरेंना रुग्णालयातून डिस्चार्ज, शस्रक्रियेमुळे सहा आठवडे घ्यावा लागणार काठीचा आधार; तर शरद पवार ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल; उद्या पित्ताशयावर शस्त्रक्रिया.

✍️महाराष्ट्रातील आरोग्य यंत्रणेचं समाधानकारक काम नाही; केंद्रीय आरोग्य सचिवांचं महाराष्ट्राच्या मुख्य आरोग्य सचिवांना पत्र....

 ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या