💥कृषी क्षेत्रातील विशेष कामगिरीसाठी प्रताप काळे यांना राज्य शासनाचा उद्यानपंडित पुरस्कार जाहीर....!

💥कृषी, सिंचन व फलोत्पादन क्षेत्रात केलेल्या विशेष कार्याची दखल💥

ताडकळस (दि.३ एप्रिल) - राज्य शासनाच्या वतीने कृषी क्षेत्रातील विशेष कामगिरीसाठी दिले जाणारे  सन 2018 व 2019 या दोन वर्षांचे पुरस्कार नुकतेच जाहीर झाले असून येथुन जवळच असलेल्या धानोरा काळे (ता.पुर्णा, जि.परभणी) येथील प्रयोगशील शेतकरी प्रताप किशनराव काळे यांना “उद्यानपंडित पुरस्कार-19 ” जाहीर झाला असुन त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

पुर्णा तालुक्यातील धानोरा काळे येथे स्व:ताच्या शेतात कृषी, सिंचन व फलोत्पादन क्षेत्रात वेगवेगळे प्रयोग करुन परिसरातील शेतकऱ्यांना अधुनिक व कमी खर्चाच्या शेतीतंत्राची माहिती देण्याचे काम प्रताप काळे करतात त्यांनी दुष्काळी परिस्थिती मध्ये अत्यअल्प पाण्यावर मोसंबीची बाग जोपसण्यासह शेद्रीय बटाटे, चिकु, देशी गायीचे तुप, विविध दाळीचे कृषी उत्पादक ते थेट ग्राहक मार्केटींगचा यशस्वी प्रयोग करुन नविन युवा शेतकऱ्या पुढे आदर्श ठेवला आहे. धानोरा काळे येथे नृसिंह स्वयंसाहय्यता बचत गटाची स्थापणा करुन गटाच्या माध्यमातुन व तालुका कृषी विभाग व व.ना.मराठवाडा कृषी विद्यापिठातील शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली सोयबीन, तुर, मुग आदी पीकांचे बीजोत्पादन घेऊन परिसरातील शेतकऱ्यांना नविन वाण माफक दरामध्ये उपलब्ध करुन दिले आहेत. त्यांच्या प्रयत्नातुन पुर्णा तालुका शेती ग्रुपच्या वतीने मागील पाच वर्षापासुन पुर्णा तालुक्या मध्ये कृषी क्षेत्रातील शास्त्रज्ञ, वरिष्ठ प्रशासकिय अधिकारी, कृषी अभ्यासक, विविध पुरस्कार प्राप्त शेतकरी, यशस्वी प्रयोगशील शेतकरी यांचे मार्गदर्शन व थेट बांधावर चर्चासत्राचे आयोजन करुन मार्गदर्शन उपलब्ध केले जाते. यामध्ये फळबागेची प्रतवारी, भाजीपाल्याची प्रतवारी, नविन तंत्रज्ञान, नवनविन संशोधित वाण, शेती कायदे, वहिवाटीचे रस्ते यावर चर्चा करुन शेतकऱ्यांना येणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केला जातो. तसेच शेतीसेवा ग्रुपच्या वतीने कृषी उत्पादित माल थेट ग्राहका पर्यंत पोहचविणे उत्पादन खर्च कमी करुन शेतीमाल उत्पादन वाढविणे व नफा वाढविण्यासाठी ते हिरीरीने पर्यंत्न करतात. प्रताप काळे यांच्या शेती व सामाजिक कार्याची दखल घेऊन विविध प्रतिष्ठित संस्थांच्या वतीने त्यांचा गौरव झाला आहे.

      यामध्ये व्हुमन सर्व्हिस फाऊंडेशन ,नाशिक  चा प्रयोगशील शेतकरी पुरस्कार -2013, आय टी सी,महिंद्रा चा उत्कृष्ट शेतकरी पुरस्कार- 2015, आत्त्मा चा सन्मान पुरस्कार -2016, महाराष्ट्र सिंचन सहयोग चा  “ विमलताई बेलसरे सिंचन पुरस्कार -2017 ” महाअग्रो,औरंगाबाद चा भंवर लाल जैन,पुरस्कार – 2018 आदी विविध मानाचे पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे. त्यांना राज्य शासनाचा उद्यानपंडित पुरस्कार-19 जाहीर होताच सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत असुन भ्रमणध्वनी वरुन शेतीनिष्ठ शेतकरी अॅड. गंगाधरराव पवार दादा, व.ना.म. कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अशोक ढवण,  कृषीभूषण कांतराव काका झरीकर, अॅड. रमेशराव गोळेगावकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष आळसे, शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल कदम, भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ.सुभाष कदम, उपविभागीय कृषी अधिकारी सागर खटकळे, प्रकल्प उपसंचालक के.आर.सराफ, पूर्णा तालुका कृषी अधिकारी रामचंद्र तांबीले , मंडळ कृषी अधिकारी निलेश आडसुळे, कृषी पर्यवेक्षक प्रवीण काळे, कृषी सहायक सुरेश काळे, माजी विस्तार शिक्षणसंचालक डॉ.बी.बी.भोसले , प्रदीप इंगोले,प्राचार्य कृषी महाविद्यालय अंबाजोगाई बाबासाहेब ठोंबरे,  कृषिविद्यावेता डॉ.यू.एन. आळसे , डॉ.आनंद गोरे , डॉ.दिलीप मोरे,किटक शास्त्रज्ञ डी. डी.पटाईत ,स.पो.नि. महेश लांडगे, वसंत मुळे,पूर्णा तालुका शेती सेवा ग्रुपचे मार्गदर्शक अमृतराज कदम,मधुकरराव जोगदंड,  पत्रकार जगदीश जोगदंड ,डॉ. हरीभाऊ पाटील ,लक्ष्मीकांत शिंदे , गजानन आंबोरे,गोविंद दुधाटे,बालासाहेब हिंगे , प्रल्हाद पारवे, सुभाषराव सुर्यवंशी, संतोष आवरंगड, मोतीराम दुधाटे, आदींनी अभिनंदन केले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या