💥सर्वोच्च न्यायालयाची नवी कोरोना नियमावली; आरटी-पीसीआर चाचणीचा अहवाल बंधनकारक....!


💥सर्वोच्च न्यायालयातील 50 टक्क्यांहून अधिक कर्मचाऱयांना कोरोनाची लागण💥 

कोरोनाच्या रुग्णवाढीची गंभीर दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. त्यानुसार कोरोनाची लक्षणे असणाऱया लोकांना न्यायालयात प्रवेश करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. न्यायालयात ये-जा करणाऱया व्यक्ती, न्यायालयीन कर्मचारी, वकील वा त्यांच्या कर्मचाऱयांपैकी कुणामध्येही कोरोनाची लक्षणे असतील तर त्या व्यक्तीला आरटी-पीसीआर चाचणी करून अहवाल दाखवावा लागेल.

सर्वोच्च न्यायालयातील 50 टक्क्यांहून अधिक कर्मचाऱयांना कोरोनाची लागण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर न्यायालयाने आपल्या आवारात येणाऱया नागरिकांच्या प्रवेशासाठी अतिरिक्त मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. या अतिरिक्त नियमांचे काटेकोर पालन व्हावे, या अनुषंगाने नियमावली अंमलबजावणीची जबाबदारी विशेष नियंत्रक अधिकाऱयांवर सोपविण्यात आली आहे. देशात कोरोनाचा संसर्ग झपाटय़ाने वाढला आहे. विषाणूच्या या दुसऱया लाटेने सरकार आणि प्रशासनासह सर्वोच्च न्यायालयाचीही चिंता वाढवली आहे.

अशी आहेत नवीन मार्गदर्शक तत्त्वे

न्यायालयातील सर्व कर्मचाऱयांनी मास्क, सॅनिटायझरचा वापर करणे आणि कोरोना नियमावलीचे पालन करणे बंधनकारक आहे. या नियमांचे पालन होतेय की नाही यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी संबंधित वरिष्ठ अधिकाऱयांची असेल न्यायालयाच्या आवारात गर्दी करू नये. कॉमन एरियामध्ये केवळ विशिष्ट कामांसाठी ये-जा सुरू ठेवावी. या परिसरातील कामे कमीत कमी वेळेत पूर्ण करावीत ताप, सर्दी, अंगदुखी, खाण्या-पिण्याची चव नसणे अशा प्रकारची कोरोनाची लक्षणे असणाऱया लोकांनी न्यायालयात येऊ नये. अशा लोकांनी विलगीकरण कक्षात जावे लिफ्टचा वापर एकावेळी केवळ तिघांनी करावा. केवळ वरच्या मजल्यांवर जाण्यासाठी लिफ्ट वापरावी.

न्यायालयातील काम संपल्यानंतर लगेच न्यायालयाच्या आवारातून बाहेर जाणे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या