💥अनुराधा सोळंकीने १३ व्या राष्ट्रीय स्तरावरील व्हिलचेयर तलवारबाजी स्पर्धात २ रोप्य व १ कांस्य पदक पटकावले...!


💥हरियाणातील करनाल येथे पार पडली तलवारबाजी स्पर्धा💥 

 ✍️ मोहन चौकेकर 

चिखली : चिखली तालुक्यातील पाटोदा येथील  अनुराधा सोळंकीने    १३ व्या राष्ट्रीय स्तरावरील व्हिलचेयर तलवारबाजी स्पर्धात २ रोप्य, व १ कांस्य पदक पटकावले ही स्पर्धा २७  व २८ मार्चला २०२१ ला हरियाणातील कर नाल येथे पार पडलेल्या स्पर्धेत १५ ते १८ राज्य सहभागी झाले होते. यात अनुराधा सोळंकीने ३न्ही प्रकार खेळून फॉईल व सेबर प्रकारात सिल्व्हर मेडल व ऐपे प्रकारात ब्रॉन्झ मेडल आपल्या महाराष्ट्र संघासाठी घेतले .या आगोदरच्या १२ व्या राष्ट्रीय स्तरावरील व्हिलचेयर तलवारबाजी स्पर्धेत अनुराधा सोळंकीने  ३ ब्रांन्स  पदक पटकावले होते . कु. अनुराधा पंढरी सोळंकी हि दिव्यांग युवती   महाराष्ट्रच्या इतिहासात व्हिलचेअर तलवारबाजी खेळात दिव्यांग युवती  म्हणुन आंतरराष्ट्रीय स्तरावर जाणारी १लीच दिव्यांग युवती  ठरली . अनुराधा पंढरी सोळंकी ही  महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण देशाचे नाव झळकावले . पॅराऑलम्पीक जागतिक व्हिलचेअर तलवारबाजी वर्ल्ड कप स्पर्धेच्या  वर्ल्ड रॅन्कींग मध्ये अनुराधा सोळंकीची   रॅन्कींग ५४ आहे. आशा प्रकारच्या रॅन्कींग मध्ये येणारी ती महाराष्ट्रातून  या खेळात सहभागी होणारी १लीच दिव्यांग महिला ठरली आहे. दिनांक. १२ नोव्हें २०१९ ते १८ नोव्हें २०१९ पर्यन्त नेदरलॅण्ड येथे पार पडलेल्या व्हिलचेअर तलवारबाजी स्पर्धा  मध्ये तिला ही रॅन्कीग मिळाली आहे . आता तिची निवड थायलंड येथे होणाऱ्या व्हिलचेयर तलवारबाजी एशियन चॅम्पिनशिय मध्ये झाली आहे . ही स्पर्धा दिनांक १२ डिसें २०२१ पासुन ते २० डिसें  २०२१ पर्यत होणार आहे. तिची घरची परिस्थीती एकदमच हलाकीची आहे .त्यामुळे वडीलांनी तिला शिकवले त्यानंतर MA केले, एवढी मोठया जबाबदाऱ्या एकट्या  वडिलावर बघुन ती स्वतः आई सोबत मजुरीला जायची व शाळेची फी भरायची गणेश जाधव सर पॅरा ऑलम्पीक बुलढाणा जिल्हा अध्यक्ष यांनी तिला अपंगासाठी पण असे खेळ असतात असे  सांगितले . १२ व्या राष्ट्रीय स्तरावर व्हिलचेयर तलवारबाजीच्या ३न्ही प्रकारात ३ ब्रांन्स मेडल मिळाले होते आपल्या यशाचे श्रेय अनुराधा सोळंकी यांनी संतोष शेजवळ सर, गणेश जाधव सर,.महेन्द्र हेमले सर यांना दिले आहे  व वेळोवेळी सहकार्य,मार्गदर्शन,आशीर्वाद,सदिच्छा देणाऱ्या सर्व लोकांचे मनापासुन आभार मानले आहे . 

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या