💥वाशीम जिल्हा स्पोर्ट्स फाउंडेशनच्या उपक्रमात सहभाग घ्यावा...!✍️फुलचंद भगत

मंगरुळपीर:-कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सुरु असलेल्या लाॅकडाउनमध्ये असलेल्या खाली वेळेचा तसेच आपली प्रतिकारशक्ती वाढावी व शरीर प्रकृती सुदृढ असावी याकरीता नियमित विविध व्यायाम करणे गरजेचे आहे.यासाठी खेळांडुसाठी एक प्लॅटफाॅर्म तयार केला असुन सर्वांनी आपापल्या विविध व्यायामाच्या क्रिडाप्रकाराचा व्हिडिओ बनवुन वाशिम जिल्हा स्पोर्ट फाऊंडेशनच्या इंन्स्टाग्राम पेजवर अपलोड करावा असे आवाहन शिवछञपती क्रिडा पुरस्कारप्राप्त सागर गुल्हाने यांनी सर्व क्रीडाप्रेमींना आवाहन केले आहे.

               सध्या सर्वञ लॉकडाउन सुरु असल्यामुळे अनेक खेळाडू हे सध्या घरातच राहत असल्या मुळे खेळाडूंच्या मानसिकतेचा विचार करून खेळाडूंचे मैदानामध्ये सराव करणे बंद झाल्या मुळे जिल्हातील असंख्य खेळाडू हे घरीच आहेत.खेळाडूसाठी एक प्लॅटफॉर्म तयार केला आहे.या मध्ये खेळाडूंना घरी राहुन आपआपल्या क्रिडा प्रकार करू शकतात उदा योगासनं , ध्यान, दोरीचे दोरखंड असे विविध क्रिडा प्रकार करून त्याचा व्हिडिओ बनवून वाशीम जिल्हा स्पोर्ट्स  फाउंडेशनच्या इन्स्टाग्राम पेजवर अपलोड करण्यात यावे असे क्रिडा प्रकार केला मुळे आपण क्रिडा प्रकारामध्ये खेळाडूसाठी संजीवनी देऊ शकतो. या प्रकारे  अनेक खेळाडूंना तुमच्या  क्रिडा प्रकारचे व्हिडिओ  बघून नवीन खेळाडूंना प्रेरणा मिळेल आणि खेळाडूंचा फावला वेळ हा  वर्क आउट मध्ये जाणार आहे.आपल्या खाली वेळेचा सदुपयोग व्हावा म्हणून सर्व खेळाडुंशी या ऊपक्रमात सहभाग नोंदवावा असे आवाहन शिवछत्रपती क्रिडा पुरस्कार प्राप्त सागर गुल्हाने यांनी जिल्हातील सर्व खेळाडूंना आवाहन केले आहे.रोज मोकळ्या हवेत चालणे, टेकडीवर, वनोद्यानात जाऊन व्यायाम व योगा करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. अनेकांना ही दररोजची सवय आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने लॉकडाऊन, संचारबंदीमुळे नागरिकांना घराबाहेर पडता येणार नाही. त्यामुळे नागरिकांनी घरीच विविध व्यायामाच्या माध्यमातून आपण आपली प्रतिकार शक्ती वाढवली पाहिजे. तसेच मानसिकदृष्ट्या सकारात्मक राहिले पाहिजे. आपल्या परिसरात आपले नातेवाईक मित्रपरिवार, बाहेरील कोरोनाची परिस्थिती खूप गंभीर झाली आहे. म्हणून आपण घाबरून जाऊ नये. त्याचबरोबर योग्य पौष्टिक आहार हा घेतलाच पाहिजे.आपली प्रतिकार शक्ती आणि आपलं आरोग्य चांगले राहू शकेल यासाठी दोन्ही जेवणाच्या वेळा पाळा. लवकर झोपण्याच्या व लवकर उठाण्याच्या वेळा देखील पाळल्याच पाहिजेत असेही सागर  गुल्हाने यांनी खेळाडुसाठी संदेश दिला आहे.


प्रतिनीधी-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या