💥तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिह यांच्या आरोप प्रकरणी माजी गृहमंत्र्यांची फक्त विचारणा...!


💥परमबीर सिह यांनी देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपये दरमहा गोळा करण्याच्या सूचना दिल्याचा केला होता आरोप💥 

तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांना शहरातील १७५० मद्यालयांकडून प्रत्येकी तीन लाख जमा होतात अशी माहिती मिळाली होती त्याबाबत देशमुख यांनी विचारणा केली असे निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी आपल्याला सांगितले गृहमंत्री आणि वाझे यांची प्रत्यक्षात भेट झाली होती का ? हे माहिती नाही असा दावा समाजसेवा शाखेचे साहाय्यक आयुक्त संजय पाटील यांनी केला तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिह यांनी देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपये दरमहा गोळा करण्याच्या सूचना दिल्याचा आरोप पत्राद्वारे केला होता.

या पत्रात त्यांनी वाझे आणि साहाय्यक आयुक्त पाटील यांचा उल्लेख  केला होता हे पत्र माध्यमांद्वारे सर्वदूर पसरल्यानंतर गुन्हे शाखेचे सह आयुक्त मिलिंद भारंबे यांनी पाटील यांच्याकडे चौकशी केली त्यांचा जबाब घेतला त्यात १ मार्चला अधिवेशनात ठाण्यातील हुक्कापार्लरबाबत तारांकित प्रश्न उपस्थित झाला होता त्या अनुषंगाने शहरातील हुक्कापार्लरबाबत माहिती घेण्यासाठी देशमुख यांनी शासकीय निवासस्थानी बोलावले होते तेथे अन्य पोलीस अधिकारीही उपस्थित होते त्या व्यतिरिक्त या कालावधीत किंवा त्याआधीही देशमुख यांच्यासोबत भेट किंवा चर्चा झाली नाही असे पाटील यांनी स्पष्ट केले. 

तसेच पोलीस आयुक्तालयाच्या आवारात वाझे यांची भेट झाली तेव्हा ते गृहमंत्र्यांना माहिती देण्यासाठी (ब्रीफिंग) भेटले होते या भेटीत गृहमंत्र्यांनी शहरातील प्रत्येक बार आस्थापनाकडून दरमहा तीन लाख रुपये जमा होतात अशी माहिती मिळाल्याचे सांगून त्यासंदर्भात विचारणा केली असे वाझेंनी आपल्याला सांगितल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले हीच बाब सिंग यांना व्हॉट्सअपवर सांगितली अशीही माहिती त्यांनी दिली....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या