💥परभणी जिल्ह्यातील रुग्णांना दिलासा ; जिल्ह्यात आरटीपीसीआर चाचण्यासाठी अद्यावत मशीन दाखल....!


💥जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी दिली माहिती,टेस्टिंगनंतर रुग्णांच्या सेवेत होणार कार्यान्वित💥

परभणी (दि.१५ एप्रिल) - कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर आरटीपीसीआर चाचण्यांचे रिपोर्ट्स अवघ्या काही तासात उपलब्ध व्हावेत या दृष्टीने जिल्हा प्रशासन व जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी केलेल्या प्रयत्नांना अखेरा यश आले असून क्वांटस्टुडिओ सेवन प्रो ही मशीन आज गुरुवार दि.१५ एप्रिल २०२१ रोजी परभणीत दाखल झाली असल्याची माहिती जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष व कार्यतत्पर जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.

दरम्यान उद्या शुक्रवार दि.१६ एप्रिल २०२१ रोजी तांत्रिक बाबींसह इंस्टॉलेशन करून टेस्टिंग घेण्यात येईल व त्यानंतर मशीन प्रत्यक्ष कार्यान्वित केल्या जाईल अशीही माहिती जिल्हाधिकारी श्री. मुगळीकर यांनी दिली.जिल्हा शासकीय रुग्णालयाअंतर्गत प्रयोगशाळेत सद्यस्थितीत दीड ते दोन हजार आरटीपीसीआर चाचण्यांच्या तपासण्या होत आहेत. चाचण्यांचे प्रमाण तसेच तपासणीचे प्रमाण यामध्ये मोठी तफावत दिसून येत होती. त्याचा परिणाम टेस्ट केलेल्या व्यक्तींना त्यांचे रिपोर्ट्स मिळाव्यास चार-सहा दिवसांचा कालावधी लागू लागला होता. 

यापुर्वी दोन-दोन आठवडे अहवाल प्राप्त होत नव्हते परंतु प्रयोगशाळेतील वैद्यकीय अधिकारी, तंत्रज्ञ व कर्मचार्‍यांनी अहोरात्र प्रयत्न करीत चाचण्यांचे अहवाल लवकरात लवकर मिळावेत या दृष्टीने प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू केल्याने दोन किंवा तीन दिवसात अहवाल प्राप्त होत आहेत. परंतु शहरासह जिल्ह्यात अन्य यंत्रणांव्दारे आरटीपीसीआर चाचण्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले . त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी प्रयोगशाळेतील तपासणीची क्षमता वाढावी, यादृष्टीने नवीन मशीनरीसाठी प्रयत्न सुरू केले होते. त्यास यश आले असून क्वांटस्टुडिओ सेवन प्रो हे अत्याधुनिक मशीन आज गुरुवार दि.१५ एप्रिल २०२१ रोजी परभणीत दाखल झाले आहे.

दरम्यान, या मशीनमुळे रुग्णालयाअंतर्गत आरटीपीसीआर चाचण्यांच्या तपासणीची क्षमता दररोज चार हजारापर्यंत जाईल. या मशीनव्दारे दर चार तासांनी अहवाल प्राप्त होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या