💥धक्कादायक : प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक संतोष गुप्ता यांच्या पत्नीने मुलीसह केली आत्महत्या.....!


💥त्या दोघींना तातडीने कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले अस्मिता यांचे रुग्णालयात पोहोचण्या आधीच निधन झाले💥

मुंबई ; बॉलिवूड दिग्दर्शक संतोष गुप्ता यांच्या पत्नी आणि मुलीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे ५५ वर्षीय अस्मिता गुप्ता आणि १६ वर्षीय सृष्टी गुप्ता या दोघींनी राहत्या घरी स्वत:ला घेत आत्महत्या केली आहे मुंबईतील अंधेरी पश्चिमेतील डी.एन. नगर या भागात राहत होत्या त्यांच्या शेजाऱ्यांनी अग्निशमन दलाला त्यांच्या घरात आग लागल्याची माहिती दिल्यानंतर ही घटना समोर आली त्या दोघींना तातडीने कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले अस्मिता यांचे रुग्णालयात पोहोचण्या आधीच निधन झाले होते. 

तर त्यांची मुलगी ७० टक्के जळली होती तिला नॅशनल बर्न्स सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते मात्र नॅशनल बर्न्स सेंटरमध्ये तिचे निधन झाले अस्मिताने मूत्रपिंडाच्या दीर्घ आजाराने त्रस्त असल्याने हे पाऊल उचलले होते आणि आईने आजारपणाचा आघात सहन न केल्यामुळे सृष्टीने आत्महत्या केली अशी माहिती तपासणी केल्या नंतर समोर आल्याचे सांगितले जाते दरम्यान, डी.एन.नगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक भरत गायकवाड यांनी सांगितले की, दोन वेगवेगळ्या अपघाती मृत्यूचे गुन्हे दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे संतोष गुप्ता यांनी अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. 

याशिवाय ‘गदर’, ‘घातक’, ‘अंदाज़ अपना अपना’ यासारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनयही केला आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या