💥वृत्तपत्र छपाईपासून वितरणा पर्यत सर्व विषय अत्यावश्यक सेवेत समाविष्ट केले गेले आहेत....!


💥"घरोघरी जाऊन अंक वितरणास तर विरोध करीत नाहीत पण स्टॉल उघडण्यास विरोध करतात"💥

मुंबई : रत्नागिरी आणि राज्याच्या अन्य काही भागातून काल मला फोन आले होते.." पोलीस घरोघरी जाऊन अंक वितरणास तर विरोध करीत नाहीत पण स्टॉल उघडण्यास विरोध करतात" या तक़ारी नंतर मी चौकशी केली असता अंक वितरणाबरोबरच स्टॉल उघडण्यास आणि स्टॉलवर अंक विकण्यास देखील परवानगी असल्याचे मला सांगण्यात आले.. त्यासंबंधीची बातमी आज सामना दिली आहे..

तेव्हा स्टॉल उघडण्यास कुठे विरोध झाला तर संबंधितांना सोबतचे कात्रण दाखवावे.. वृत्तपत्र छपाईपासून वितरणा पर्यत सर्व विषय अत्यावश्यक सेवेत समाविष्ट केले गेले आहेत.. मागच्या वेळेस अजोय मेहता यांनी वृत्तपत्राच्या माध्यमातून कोरोनाचा प्रसार होतो असा दावा करीत वृत्तपत्र वितरणास बंदी घातली होती..पण वर्तमान पत्रामुळे कोरोना झाल्याचे एकही उदाहरण देशभर दिसून आले नाही.. पण या अफवेचा मोठा फटका वृत्तपत्र व्यवसायाला बसला.. अंकांचे खप गडगडले आणि पत्रकार आणि पत्रकारेतर 12 हजार लोकांच्या नोकरया गेल्या..माध्यम जगताचा अपरिमित हानी झाली..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या