💥परभणी जिल्ह्यात २५ एप्रिल २०२१ पर्यंत सूट दिलेल्या सर्व अस्थापना कडकडीत बंद राहणार....!


💥जिल्ह्याचे जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी आज बुधवार दि.२१ एप्रिल रोजी सायंकाळी एक आदेश केला जारी💥

परभणी (दि.२१ एप्रिल) - जिल्ह्यातील कोरोना विषाणूंचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आज बुधवार दि.२१ एप्रिल २०२१ रोजी सायंकाळी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी एक आदेश जारी करून जिल्ह्यातील सुट दिलेल्या अस्थापना २५ एप्रिल २०२१ पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.



परभणी जिल्हा प्रशासनाकडून कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून संचारबंदीच्या काळात जिल्ह्यात अत्यावश्यक सेवा म्हणून ज्या बाबींचा समावेश करण्यात आला होता त्यापैकी बँका,किराणा दुकाने,भाजीपाला दुकाने,भाजीबाजार,फळ विक्रेते,बेकरी,मिठाई, खाद्य दुकाने वगैरे अस्थापना येत्या दि.२५ एप्रिल २०२१ पर्यंत पूर्णतः बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी सायंकाळी दिले आहेत.जिल्ह्यातील सर्व बँकांना अंतर्गत कामांसह पेट्रोलपंप,गॅस एजन्सी यांचे बँक व्यवहार,कोरोना विषयक वैद्यकीय सेवा देणार्‍या यांचे व्यवहार व शासकीय कामकाज इत्यादी कामकाज करावे लागणार आहे....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या