💥…म्हणून सचिन वाझे यांनी केली मनसुख हिरेनची हत्या,एन.आय.ए.च्या तपासात निष्पन्न....!


💥हिरेन यांच्या हत्येत सहभाग नसल्याचं वाझेंकडून सांगितलं जात असलं तरी त्यांच्याविरुद्ध पुरावे आहेत💥 

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर ठेवण्यात आलेल्या स्कॉर्पिओ गाडीचे मालक मनसुख हिरेन यांच्या हत्या प्रकरणात एन.आय.ए.च्या तपासातून आणखी एक बाब समोर आली आहे अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकं आढळून आल्यानंतर राज्यात खळबळ उडाली होती सध्या मुद्दा गाजत असतानाच मनसुख हिरेन यांची हत्या करण्यात आली हिरेन यांच्या हत्येमागील कारणांचा हळूहळू उलगडा होत असून, तपासातून नवी माहिती समोर आली आहे.

‘इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना सूत्रांनी तपासाबद्दलची माहिती दिली आहे अँटिलियाजवळ स्फोटकं असललेली स्कॉर्पिओ गाडी आढळून आली होती या गाडीचे मालक मनसुख हिरेन होते हिरेन यांनी गाडी चोरीला गेल्याचं म्हटलं होतं पण गाडी चोरीला गेली नाही तर हिरेन यांनीच गाडीची चावी वाझे यांना दिली होती असं तपासातून समोर आलं आहे.“हिरेन यांचा शवविच्छेदन अहवाल अद्याप आलेला नाही मात्र प्राथमिक दर्शनी असं दिसत की, हिरेन यांचा मृत्यू गळा दाबून नव्हे तर श्वास कोंडल्यानं झालेला आहे. 

त्यांच्या मृतदेहावर अशा कोणत्याही खुणा आढळून आलेल्या नाहीत शवविच्छेदन अहवालातून हे निश्चित होईल जेव्हा मृतदेह त्यांचा मृतदेह वाहून आला तेव्हा त्यांच्या तोंडातून अनेक हातरुमाल बाहेर काढण्यात आले होते असं अधिकाऱ्यानं नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर सांगितलं स्फोटकांनी भरलेली गाडी आढळण्यापूर्वी हिरेन यांनी स्कॉर्पिओ गाडीची चावी वाझे यांना दिली होती त्यानंतर पोलीस ठाण्यात जाऊन कार चोरीला गेल्याची तक्रार हिरेन यांनी केली होती. 

दरम्यान हिरेन यांच्या हत्येत सहभाग नसल्याचं वाझेंकडून सांगितलं जात असलं तरी त्यांच्याविरुद्ध पुरावे आहेत असंही सूत्रांनी सांगितलं....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या