💥त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा,एक मुलगी व भाऊ असा परिवार आहे💥
परभणी (दि.४ एप्रिल) - परभणी येथील प्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉ.सुनिल करडेकर यांचे आज रविवार दि.४ एप्रिल २०२१ रोजी सकाळच्या सुमारास औरंगाबाद येथील खाजगी रुग्णालयात दीर्घ आजाराने वयाच्या ६१ व्या वर्षी निधन झाले त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा,एक मुलगी व भाऊ असा परिवार आहे.
डॉ.करडेकर हे एक दिलदार,दिलखुलास असे व्यक्तीमत्व होते.वैद्यकीय क्षेत्रात एक अभ्यासू,तज्ञ म्हणूण ते ओळखले जात.वैद्यकीय शिक्षणात ते सुवर्ण पदक प्राप्त विद्यार्थी होते.इंग्रजी भाषेवर त्यांचे अफालातून प्रभुत्व होते.त्यांचा मोठा मित्र परिवार होता.त्यांच्या निधनाने परभणी व हिंगोली जिल्हावासियांना मोठा धक्का बसला आहे....
0 टिप्पण्या