💥पूर्णा तालुक्यातील गौर येथील अत्यंत जागृत देवस्थान असलेल्या सोमेश्वर महाराज यात्रा कोरोना महामारीमुळे रद्द....!


💥गौर गावात आमली बारशी निमित्ताने भरणारी यात्रा व कुस्तीचा डाव कोरोनामुळे रद्द केल्याचे संस्थानने जाहीर केले💥

पूर्णा (दि.२५ एप्रिल) तालुक्यातील गौर येथील सोमेश्वर महादेवाचे अत्यंत जागृत देवस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री सोमेश्वर महाराज यांची आमली बारशी निमित्ताने प्रतिवर्षी भरणारी भव्य यात्रेसह कुस्तीचा डावही यावर्षी वाढत्या कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली आहे अशी माहीती श्री सोमेश्वर देवस्थानचे अध्यक्ष रामराव पारवे व सोपानराव जोगदंड यांनी दिली आहे. 


कोरोनाचा प्रादुर्भाव हा ग्रामीण भागातही झपाट्याने वाढत आहे म्हणून आमली बारशीनिमित्ताने श्री सोमेश्वर महाराज यांच्या पालखी मिरवणूक सोहळा , जंगी कुस्तीचा डाव , नाटक , संगीत भजन रद्द करण्यात आले आहे . पाच दिवशीय यात्रा भरणार नाही म्हणून तालुक्यातील परीसरातील व गावातील  नागरीकांनी घरूनच पुजा अर्चा करावी व कोरोनाचा गुणाकार होणार नाही जीव वाचला तर अनेक यात्रा करु असे आवाहन सोपानराव जोगदंड यांनी केले आहे .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या