💥अकोला जिल्ह्यातल्या बार्शीटाकळी तालुक्यातील वाघा गड येथे ५.५ फुट लांब अजगराला जीवदान देवून सुखरुप जंगलात सोडले...!


💥गुप्तेश्वर महाराज संस्थान च्या स्वयंपाकघरात सकाळच्या सुमारास निघाला होता एक मोठा अजगर💥 

✍️फुलचंद भगत

वाशिम:- अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील वाघा गड येथील गुप्तेश्वर महाराज संस्थान च्या स्वयंपाकघरात सकाळच्या सुमारास एक मोठा साप तेथील काम करणाऱ्यांना दिसला. त्यांनी लगेच वाईल्ड लाईफ कंझर्वेशन टिम वाशिम शाखा वनोजा व साळुंकाबाई राऊत महाविद्यालय आपत्ति व्यवस्थापन बचाव पथक वनोजा चे सदस्य आदित्य इंगोले यांना माहिती दिली. माहिती वरून आपले सहकारी राहुल राठोड, वैभव गावंडे व शुभम हेकड, राहुल साखरे यांच्या सोबत घटनास्थळी दाखल झाले. पाहणी केली असता तो साप ५.५ फुट लांब अजगर ( Indian Rock Pythan) होता. यावेळी सदस्यांनी या अजगराला वाशिम जिल्हयाचे मानद वन्यजीव रक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरक्षित रित्या रेस्क्यू केला व नंतर बार्शीटाकळी वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. डांगे यांना माहिती देऊन वनरक्षक सौ. धोत्रे यांच्या मदतीने तिवसा येथील वनपरिक्षेत्रामध्ये सोडत अजगराला जीवदान दिले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या