💥परळी तालुक्यातील भोजनकवाडी येथील भक्तराम फड यांची पुण्यातील कोविड सेंटर मध्ये वैद्यकीय सेवा कौतुकास्पद...!


💥ग्रामपंचायत सदस्य विजय बडे यांनी भक्तराम फड यांच्या उल्लेखनीय कार्याचे केले कौतुक💥 

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव दिवसेंदिवस वाढत असून अशा भयानक परिस्थिती तालुक्यातील भुमीपूत्र भक्तराम फड हे पुणे वैद्यकीय सेवेत कार्यरत आहेत. ते गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या जिवाची पर्वा न करता कोरोना ग्रंस्त रूग्णाच्या कोविड वार्डात सेवा देत आहेत. त्यांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे ग्रामपंचायत सदस्य विजय बडे यांनी सांगितले आहे. 

           कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे रुग्ण संख्येत झालेल्या चिंताजनक वाढीने आरोग्य यंत्रणेवरील भार वाढला आहे.कोरोनाग्रस्तांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण निर्माण झालेला आहे. कारण,दररोजच शेकडोंच्या पटीत कोरोना बाधितांची संख्या ही वाढत आहे. आरोग्य यंंत्रणेत काम करणारे डॉक्टर, कर्मचारी,नर्स हे आपले बंधू आणि भगिनी आहेत,अहोरात्र ही सर्व यंत्रणा आपल्या सर्वांसाठी जीवाची बाजी लावून काम करीत आहेत. अशा परिस्थितीत ही परळीचा भुमीपूत्र भक्तराम फड हे आपले कार्य चांगल्या प्रकारे करत आहेत.  तसेच कोरोनाच्या रूग्णालयात प्रचंड वाढ होत असल्यामुळे गावाकडचे नातेवाईक व कुटुंब काळजी घ्यावी असे सांगत आहे. अशा भयानक परिस्थिती न डगमगता वैद्यकीय सेवा अविरतपणे देत आहे. फड यांचे कोरोना योध्दा म्हणून सर्वत्र कौतुक होत आहे. समाजात अशी काही माणसे असतात कि, जी काम कमी करतात पण कामाचा डांगोरा जास्त पिटतात,काही अशी पण माणसे असतात कि ती काम खुप करतात पण केलेल्या कामाची जाहिरात करीत नाहीत,आपले काम प्रामाणिक पणे करत असतात, आपल्या गावात असेच एक व्यक्तिमत्व आहे, भक्तराम फड कोरोनाच्या काळात कोरोना योध्दा म्हणून प्रमाणीक पणाने सेवा बजावत आहेत. सध्या ते पुणे येथे एका खाजगी दवाखान्यात येथे कार्यरत आहेत,सध्या कोरोना या महामारीने सर्वत्र थैमान घातले असल्या मुळे सर्व लोक त्रस्त झाले आहेत,कोरोना झालेल्या रूग्णाच्या आस पास ही कोणी फिरकत नाही,अशा काळात भक्तराम फड  आपला जीव धोक्यात घालून आपले कर्तव्य निष्ठेने करत आहे. गेल्या वर्षी कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत रोज वैद्यकीय सेवा करत राष्ट्रीय कर्तव्य ते आपला जीव धोक्यात घालून करीत आहेत. अनेक रुग्णाना योग्य सल्ला ,तसेच मार्गदर्शन व त्यांचे समुपदेशन ते करतात, त्यांच्या या. कौतुकास्पद वैद्यकीय सामाजिक कार्याबद्दल अनेकांनी कौतुक करून अभिनंदन केले. "कोरोना योध्दा" भक्तराम फड हे कोरोना महामारी मध्ये कोरोना रूग्णांना देत असलेली पाहून आमचे उर भरून येते असे विजय बडे यांनी सांगितले आहे.  परळी तालुक्यातील भूमिपुत्र तथा भक्तराम फड यांचे पुणे येथील वैद्यकीय सेवा कोरोनाच्या संकट काळातील कार्य सर्वांसाठी कौतुकास्पद असल्याचे प्रदेश अध्यक्ष स्वाभिमानी संघर्ष सेना लोकनियुक्त ग्रामपंचायत सदस्य विजय बडे सांगितले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या