💥फ्रान्स ते भारत नॉन स्टॉप प्रवास करत तीन नवीन राफेल विमान भारतात दाखल...!


💥राफेल विमानांमुळे भारतीय हवाई दलाची ताकद चार पटींनी वाढली आहे💥

 रात्री ११ च्या सुमारास तीन नवीन राफेल फायटर जेट विमानं फ्रान्समधून भारतात दाखल झाली आहे गुजरातमधील जामनगर एअर बेसवर रात्री ११ च्या आसपास या राफेल विमानांच्या तुकडीने लॅण्डींग केलं फ्रान्समधून उड्डाण घेतल्यानंतर ही राफेल विमान कुठेही न थांबता थेट भारतात पोहचली विशेष म्हणजेच या उड्डाणादरम्यान यु.ए.ई.च्या मदतीने या विमानांना एअर टू एअर री फ्यूलिंगच्या माध्यमातून हवेतच इंधन भरण्यात आलं या नव्याने दाखल झालेल्या राफेल विमानांमुळे भारतीय हवाई दलाची ताकद चार पटींनी वाढली आहे. 

 राफेल विमानांची ही चौथी तुकडी भारतामध्ये दाखल झाल्यानंतर भारतीय हवाई दलाने जारी केलेल्या अधिकृत माहितीनुसार यु.ए.ई. हवाई दलाच्या मदतीने या विमानांना हवेतच इंधन भरण्यात आलं या अशापद्धतीने इंधन भरणं हे ऐतिहासिक असून या माध्यमातून दोन्ही देशांमधील संबंध किती मजबूत आहेत हे दिसून आल्याचं भारतीय हवाई दलाने म्हटलं आहे ही घटना दोन्ही देशांच्या हवाई दलांसाठी अभिमानास्पद असल्याचंही सांगण्यात आलं आहे.

या तिन्ही राफेल विमानांना अंबाला येथील गोल्डन एरो स्क्वाड्रनमध्ये समाविष्ट करुन घेण्यात येणार आहे या तीन नवीन राफेल विमानांमुळे आता भारतीय वायुसेनेकडे असणाऱ्या राफेल विमानांची संख्या १४ पर्यंत गेली आहे राफेल विमानांची पुढील तुकडी एप्रिल महिन्यामध्ये भारतामध्ये दाखल होणार आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या