💥जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स ; दिवसभराच्या महत्त्वाच्या हेडलाईन्स....!


💥पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित पंडित राजन मिश्रा यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन💥

 ✍️ मोहन चौकेकर

1 .  ठाण्यातील वेदांता रुग्णालयात ऑक्सिजनअभावी 4 रुग्णांचा मृत्यू ? घटनेची चौकशी होणार  

2 . श्रेयवादासाठी घोषणा करणं योग्य नाही; मोफत लसीकरणावरुन महसूल मंत्री बाळासाहेब थोरांताचा राष्ट्रवादीला टोला ; राज्यात सरसकट मोफत लस देण्याबाबत महाविकास आघाडीतील मंत्र्यांमध्ये मतभिन्नता 

3 . मोफत लस देण्याचं पंतप्रधानांनी स्पष्ट केलंय तरीही, महाविकास आघाडीच्या तीन पक्षांमध्ये एकवाक्यतेचा अभाव..  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा आरोप 

4 .  करोडोच्या जनतेला लस कशी मिळणार ? काय आहे सरकारचा प्लॅन?   मोफत लसीकरणाचा राज्याच्या तिजोरीवर आर्थिक भार, आर्थिक गणितं कशी जुळवणार?

5 .  कोरोना लढ्यासाठी अधिकारी महासंघाचा सरकारला मदतीचा हात, एप्रिल आणि मे महिन्यातील एकेक असं दोन दिवसांचं वेतन मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देणार.. राजपत्रित अधिकारी महासंघाचं अजित पवारांना पत्र  

6 . 'निवडणूक अधिकाऱ्यांवर हत्येचा गुन्हा दाखल व्हायला हवा', कोरोना काळात राजकीय सभांना परवानगी देण्यावरुन मद्रास हायकोर्टाचा संताप 

7 . देशात कोरोनाबाधितांच्या विक्रमी आकड्याची नोंद; मृतांचा आकडाही धडकी भरवणारा, 24 तासांत 3 लाख 52 हजार 991 नव्या रुग्णांची नोंद ; राज्यात रविवारी 66,191 रुग्णांची नोंद, 61,450 रुग्ण कोरोनामुक्त 

8 . पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित पंडित राजन मिश्रा यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, कोरोनाची बाधा झाल्यानंतर ह्रदयविकाराचा झटका 

9 .  ऑस्करमध्ये नोमॅडलँड ठरला यावर्षीचा सर्वोत्कृष्ट चित्रपट ना सूत्रसंचालन, ना प्रेक्षक... यंदाचा अनोखा ऑस्कर सोहळा; तर इरफान खान, भानू अथय्या यांना आदरांजली            

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या