💥फक्त लॉकडाऊन करून भागणार नाही; भाजपा नेते सुधीर मुनगंटीवारांचा सरकारवर निशाणा...!


💥मुनगंटीवार यांनी आपल्या ट्वीटरवरून एक व्हिडीओ पोस्ट करत सरकारला काही प्रश्न विचारले आहेत💥

राज्यातल्या करोनाच्या दिवसेंदिवस गंभीर होत चाललेल्या परिस्थितीवर लॉकडाऊन हाच पर्याय असल्याची चर्चा सुरू झाली आहे यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय नेत्यांशी आणि मंत्रिमंडळातील प्रमुख मंत्र्यांशी चर्चा सुरू केली आहे.

 या पार्श्वभूमी भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या ट्वीटरवरून एक व्हिडीओ पोस्ट करत सरकारला काही प्रश्न विचारले आहेत. तसेच, फक्त लॉकडाऊन लागू केला म्हणजे आपलं काम झालं, असं न करता सरकारला काही जबाबदाऱ्या देखील घ्याव्या लागतील, असं देखील सुधीर मुनगंटीवार यांनी या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे. राज्यात सध्या संपूर्ण लॉकडाऊन लागू न करता काही निर्बंध लागू करण्यात आले आहेत. गेल्या महिन्याभरात राज्यातली रुग्णसंख्या वेगाने वाढू लागली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागू होणार की आहेत तेच निर्बंध अधिक कठोर केले जाणार? यावरून मोठी चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर सुधीर मुनगंटीवार यांनी राज्य सरकारला सवाल केले आहेत. “सरकारला जबाबदारी घ्यावी लागेल” लॉकडाऊननंतर सरकारला जबाबदारी देखील घ्यावी लागेल, असं मुनगंटीवार या व्हिडीओमध्ये म्हणाले आहेत. “लॉकडाऊनचा निर्णय तर्कावर आधारीत होईल. पण लॉकडाऊन करताना काही पथ्य ठेवावी लागतील. काही नियोजन करावे लागेल. सरकारला काही जबाबदारी घ्यावी लागेल. फक्त लॉकडाऊन केलं, की आपलं कार्य संपलं असा विचार सरकारने करू नये. विजेच्या संदर्भात निर्णय घ्यावा लागेल, सर्वसामान्यांच्या संदर्भात पॅकेजचा निर्णय घेतला जाईल का? छोट्या उद्योगांचं काय होईल? महिन्याला इएमआय भरणाऱ्यांसाठी राज्य सरकार काही करणार आहे का ? असेही ते म्हणाले...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या