💥शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी अन्नप्रक्रिया उद्योग अधिक विकसित करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय....!


💥अन्नप्रक्रिया उद्योगाला ११ हजार कोटींचे प्रोत्साहन💥

 शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी अन्नप्रक्रिया उद्योग अधिक विकसित करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून या क्षेत्रासाठी उत्पादनाशी निगडित १०,९०० कोटींचा प्रोत्साहन निधी देण्याच्या प्रस्तावाला  केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली हा निधी पुढील पाच वर्षांच्या कालावधीत दिला जाणार आहे दरम्यान, दिल्लीच्या वेशींवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असून मे महिन्यात संसदेवर मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

दिल्लीच्या वेशींवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्राने घेतलेला हा महत्त्वाचा निर्णय असल्याचे मानले जात आहे अन्नप्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन निधी पुरवण्यामागे केंद्राचे दोन उद्देश असून शेतीमालाचे नुकसान रोखले जाईल तसेच शेतमालाला अधिक दर मिळू शकतील त्यातून शेतकऱ्यांना आर्थिक लाभ होऊ शकेल या क्षेत्रात देशी व परदेशी अन्नप्रक्रिया कंपन्या गुंतवणूक करू शकतील व त्यातून पुढील पाच वर्षांमध्ये २.५ लाख लोकांना रोजगार मिळेल. 

गेल्या वर्षी केंद्र सरकारने ‘आत्मनिर्भर भारत’ योजनेमध्ये १० क्षेत्रांना उत्पादनाशी निगडित प्रोत्साहन निधी देण्याची घोषणा केली होती त्यात अन्नप्रक्रिया उद्योगाचाही समावेश करण्यात आला होता तीन नव्या शेती कायदे अन्नप्रक्रिया उद्योगासाठी अनुकूल ठरतील असा दावा केंद्र सरकारने केला आहे करोनाच्या काळात प्रक्रिया केलेल्या खाद्यान्नाची मागणी वाढली असून या क्षेत्रातील गुंतवणूकवाढीसाठी केंद्राने अन्य उत्पादन क्षेत्रांप्रमाणे अन्नप्रक्रिया उद्योगालाही आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला आहे पुढील सहा वर्षांमध्ये सुमारे ३ लाख रोजगार निर्माण होऊ शकतील....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या