💥परभणी जिल्ह्यात आज बुधवारी आढळले ५१२ कोरोनाबाधीत रुग्ण...!


💥जिल्ह्यात आज बुधवारी रुग्णालयात उपचारा दरम्यान २१ कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू💥 

परभणी (दि.२१ एप्रिल) - जिल्ह्यात आज बुधवार दि.२१ एप्रिल रोजी रुग्णालयात उपचा दरम्यान तब्बल २१ कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात हाहाकार माजला असून जिल्ह्यात कोरोना महामारी दिवसेंदिवस उग्ररुप धारण करीत असल्यामुळे प्रशासनाने जिल्ह्यात आणखी कडक निर्बंध लावण्याचा निर्णय घेतल्याचे दिसत असून आज बुधवारी जिल्ह्यात पुन्हा नव्याने ५१२ कोरोनाबाधीत रुग्ण आढळले असून जिल्ह्यात सातत्याने कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या वाढतांना पाहावयास मिळत असून जिल्ह्यात रुग्णालयात औषधोपचार घेऊन बरे झालेल्या ६८४ कोरोनामुक्त व्यक्तींना आज रुग्णालयातून सुट्टी देण्यात आल्याची माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयाने प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली.

जिल्हा शासकीय रुग्णालयातील कोविड कक्षात ५ हजार ७१२ कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत जिल्ह्यात आजपर्यंत ७१० कोरोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर जिल्ह्यात आजपर्यंत २७ हजार ८१० कोरोनाबाधित व्यक्ती आढळल्या आहेत. त्यापैकी २१ हजार ३८८ व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या आहेत. रुग्णालयातर्फे आतापर्यंत २ लाख १८ हजार ७७६ व्यक्तींचे नमुने तपासण्यात आले. त्यात १ लाख ९० हजार १५९ व्यक्तींचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. तर २७ हजार ६६२ व्यक्तींचे नमुने पॉझिटिव्ह,८१५ अनिर्णायक व १४० नमुने नाकारल्या गेले असल्याचे जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.बाळासाहेब नागरगोजे यांनी प्रसिध्द केलेल्या प्रेसनोटद्वारे कळविले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या