💥महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर खऱ्या अर्थाने स्त्रियांचे मुक्ती दाते........!


💥परभणी महानगर पालिकेच्या महापौर अनिता सोनकांबळे यांचे प्रतिपादन💥

पूर्णा (दि.२८ एप्रिल) - भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरव  भगवान बुद्ध सार्वजनिक जयंती मंडळ पूर्णा चे वतीने चैत्र पौर्णिमेनिमित्त बुद्ध विहार या ठिकाणी धम्म देशना चे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी  प्रमुख सत्कारमूर्ती अनिता सोनकांबळे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची महानता दूरदृष्टी विशद करताना संगितले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खऱ्या अर्थाने स्त्रियांचे मुक्तिदाते आहे त. हिंदूकोड बिलाच्या माध्यमातून स्त्रियांना समानतेचा व स्वातंत्र्याचा हक्क दिला.


जयंती मंडळाचे अध्यक्ष भदंतडॉ. उपगुप्त महाथेरो भंते बोधिधम्मा भंते पायावांश जयंती मंडळाचे कार्याध्यक्ष प्रकाश कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रेल्वे कर्मचारी संघटनेचे अशोक  कांबळेहे होते.प्रमुख पाहुणे सुप्रसिद्ध कॉन्ट्रॅक्टर कॉन्ट्रॅक्टर यशवंत उबारे हे होते प्रमुख उपस्थितांमध्ये माजी नगराध्यक्ष प्राचार्य मोहनराव मोरे नगरपालिकेचे गटनेते उत्तम भैय्या खंदारे  श्यामराव जोगदंड मुगाजी खंदारे पत्रकार विजय बगाटे महानंद गायकवाड श्रीकांत हिवाळे गौतम वाघमारे टी झेड कांबळे शिवाजी थोरात बौद्धाचार्य त्र्यंबक कांबळे अतुल गवळी यांची उपस्थिती होती.

चैत्र पौर्णिमेच महत्व भंते प यावंश व बोधी धम्म यांनी सांगितले. धम्म प्रमाणे आचरण केल्यास जबाबदार कर्तव्यदक्ष नितीमान नागरिक तयार होऊ शकतात वसमत येथील सुप्रसिद्ध कॉन्ट्रॅक्टर यशवंत उबारे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारण्यात मोलाचे योगदान दिल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला जयंती मंडळाचे कार्याध्यक्ष प्रकाश कांबळे यांनी तरुणाईने बुद्ध विहारात नियमितपणे आले पाहिजे विहराचे सुशोभिकरण करण्यामध्ये प्रत्येकाने योगदान दिले पाहिजे. असे सांगितले.


प्रास्ताविक नगरपालिकेचे गटनेते उत्तम भैय्या खंदारे यांनी केले. जयंती फक्त नाचू नच साजरी केली नाही तर ऑनलाइन व्याख्यानमालेच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार महाराष्ट्रामध्ये पोहोचण्याचा प्रयत्न केला जयंती मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर उप गुप्त महाथेरो यांनी आपल्या धम्म देश ने मध्ये महामानव तथागत भगवान बुद्ध बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा मानवमुक्तीचा विचार देशाला व जगाला दिशा देऊ शकतो यावेळी जयंती मंडळाचे पदाधिकारी भीमा वाहुले, राजकुमार सुर्यवंशी,नागेश यंग डे संजय शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे अधक्ष अशोक कांबळे यांनी तरुणांना संबोधित करताना सांगितले शीलवान, नितीमा न बनून समाजाला दिशा देण्याचं काम तरुणांनी करावं. कार्यक्रमाचे सूत्र संचालन नितीन नरवडे यांनी केले आशिर्वाद गाथे ने समारोप झाला...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या