💥अभिनेता अजय देवगणने मुंबई महापालिकेला दिले १ कोटी; दादरमध्ये उभारणार ऑक्सिजन बेड्सचं कोव्हिड सेंटर....!


💥महापालिकेच्या बिझनेस डेव्हलपमेंट सेलकडे अजयच्या एनव्हाय फाऊण्डेशनकडून एक कोटी रुपये देण्यात आले💥

मुंबई मधील करोनाबाधितांची संख्या लक्षात घेत मुंबई महानगरपालिकेने शिवाजी पार्क येथील भारत स्काऊट आणि गाईड हॉलचे २० बेड्सच्या आयसीयु रुग्णालयात रुपांतर केलं आहे. या रुग्णालयामधील पॅरामॉनिटर्स, व्हेंटिलेटर्स आणि ऑक्सिजन सपोर्ट सिस्टीमसाठी अभिनेता अजय देवगणने मदत केली आहे. अजयने त्याच्या मित्रांसोबत मिळून एक कोटी रुपयांचा निधी या कामासाठी मुंबई महानगरपालिकेला दिलाय.

महापालिकेच्या बिझनेस डेव्हलपमेंट सेलकडे अजयच्या एनव्हाय फाऊण्डेशनकडून एक कोटी रुपये देण्यात आलेत. हा निधी मिळाल्यानंतरच महानगरपालिकेने या ठिकाणी ऑक्सिजन बेड्सची व्यवस्था असणारे सेंटर उभं करण्याचं काम युद्ध पातळीवर सुरु केलं “हिंदुजा रुग्णालयामध्ये रुग्णसंख्या वाढल्याने तेथील उपलब्ध सुविधांवर ताण निर्माण झालेला. तसेच स्थानिकांनाही आयसीयु बेड्सची गरज होती. अजय देवगणने बीएमसीला केलेली मदत फार मोलाची आहे. या नव्या कोव्हिड सेंटरमुळे इतर मोठ्या रुग्णालयांवरील ताण कमी होईल. येथे येणाऱ्या रुग्णांना चांगले उपचार देण्याला आमचं प्राधान्य राहिलं. विशेष म्हणजे हे कोव्हिड सेंटर चालवण्यासाठी मदत करायला हिंदुजा रुग्णालयाने पुढाकार घेतला आहे. सध्या सर्वांनाच आयसीयुची गरज असल्याने याचा नक्कीच फायदा होईल,” असं स्थानिक नगरसेविका असणाऱ्या विशाखा राऊत यांनी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितलं.

सरकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या केंद्राचा संपूर्ण कारभार माहीमच्या पी. डी. हिंदुजा रुग्णालयाच्या व्यवस्थापनाकडून पाहिला जाणार आहे. हिंदुजाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी असणाऱ्या जॉय चक्रवर्ती यांनी दिलेल्या माहितीनुसार, “हिंदुजा रुग्णालय या २० बेड्सच्या केंद्राचं व्यवस्थापन पाहणार आहे. हे केंद्र म्हणजे हिंदुजाचेच एक्सटेन्शन असेल. येथील रुग्णांना जेवण, उपचार, औषधे सर्व काही पुरवलं जाईल. येथील डॉक्टर्स आणि नर्सही हिंदुजाचेच असती. राज्य सरकारने निर्धारित करुन दिलेल्या दरांप्रमाणे रुग्णांकडून पैसे घेतले जातील. हे उपचार परवडणारे असतील. बीएमसीला या कामात सहकार्य करत असल्याचं आम्हाला समाधान आहे,” असं सांगितलं.

नगरसेविका राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार या ठिकाणी दादर पश्चिमेतील रुग्णांवर तसेच माहीम आणि आजूबाजूच्या परिसरातील रुग्णांवर उपचार केले जातील. अजय देवणग याने निधी गोळा करण्यासाठी पुढाकार घेतला असला तरी बोनी कपूर, आनंद पंडित यासारख्या व्यक्तींनीही या निधीमध्ये योगदान दिल्याचं एका अधिकाऱ्याने सांगितलं मागील वर्षी मे महिन्यामध्ये अजय देवगणने बीएमसीला धारावीमध्ये पहिलं रुग्णालय उभारण्यास मदत केली होती. धारावीच्या मध्यभागी असणारे हे रुग्णालय ४००० स्वेअर मीटर जमीनीवर उभारण्यात आलं आहे, एमएमआरडीच्या माहिम नॅचरल पार्कसाठी नियोजित पार्किंगच्या जागेवर हे उभं करण्यात आलंय....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या