💥परभणी जिल्ह्यात आज शनिवारी नव्याने आढळले ८०४ कोरोनाबाधीत रुग्ण...!

 


💥जिल्ह्यात आज रुग्णालयात उपचारा दरम्यान २२ कोरोनाबाधीत रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू💥 

परभणी (दि.२४ एप्रिल) - परभणी जिल्ह्यात कोरोना महामारीचा उद्रेक थांबता थांबत नसून जिल्ह्यात कोरोना महामारीने अक्षरशः हैदोस घातल्याचे दिसत असून जिल्ह्यात सातत्याने कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढतांना दिसत असून जिल्ह्यात आज शनिवार दि.२४ एप्रिल २०२१ रोजी तब्बल ८०४ कोरोनाबाधीत रुग्णांची वाढ झाल्याने जिल्ह्यात सर्वत्र खळबळ माजली असून जिल्ह्यात कोरोनाबाधीतांच्या मृत्यूचा आकडाही वाढत असल्याने प्रशासन अक्षरशः हादरले असून जिल्ह्यात आज शनिवारी रुग्णालयात उपचारा दरम्यान २२ कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून प्रेसनोटद्वारे कळवण्यात आहे आहे तर रुग्णालयात औषधोपचार घेऊन बरे झालेल्या ५३२ कोरोनामुक्त व्यक्तींना आज गुरुवारी रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.....



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या