💥कोरोना वार्डात रुग्णांना भेटण्यास आलेल्या आमदार संतोष बांगर यांना पाहून रुग्ण भारावले...!


💥यावेळी कोरोना रुग्णांनी तुम्ही आमच्यासाठी देवच आहात अशा भावना व्यक्त केल्या💥

कोरोना महामारीच्या च्या प्रादुर्भावाने सगळीकडे हाहाकार माजलेला असताना ,सगळे लोकप्रतिनिधी स्वतः च्या जिवाच्या भीतीने आपला मोबाईल बंद करून घरात बसलेले असताना हिंगोली जिल्ह्यातील शिवसेनेचा ढाण्या वाघ हिंगोली शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार संतोष बांगर हे कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत 24 तास आमदार बांगर यांचा मोबाईल चालू असून कुणाला बेड नाही भेटला तर त्याला बेड ची व्यवस्था करणे कुणाला रेमडीसीवर इंजेक्शन भेटत नसेल तर त्याचीही व्यवस्था करणे अशा एक ना अनेक रुग्णांच्या तक्रारी ऐकून घेऊन त्या सोडवण्यात आमदार साहेब 24 तास व्यस्त आहेत आज जिल्हा कोरोना रुग्णालयात कोरोना रुग्णांची विचारपूस करण्यासाठी आमदार संतोष बांगर हे कोरोना वॉर्डात गेले आणि सर्व कोरोना रुग्णांची आस्थेवाईकपणे विचारपूस करत असताना कोरोना वॉर्डातील अनेक कोरोना रुग्णांना अक्षरशः रडू कोसळले, काही रुग्णांना भावना अनावर झाल्या कोरोना झाल्यावर लोकप्रतिनिधीनी, जवळच्या नातेवाईकांनी आमच्याकडे पाठ फिरवलेली असताना तुम्ही एकमेव असे आहात जे प्रत्यक्ष कोरोना वॉर्डात येऊन आम्हाला भेटले, तुम्ही आमच्यासाठी देवच आहात अशा भावना व्यक्त केल्या....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या