💥काशी विश्वनाथ मंदिर- ज्ञानवापी मशीद वाद : मे.न्यायालयाने पुरातत्व खात्याला दिली सर्वेक्षणाची परवानगी....!


💥यासंदर्भातील आदेश मे.न्यायालयाने जारी केल्याचं वृत्त बार अँड बेंच या कायदेविषयक वेबसाईटने दिलं आहे💥

काशी विश्वनाथ मंदिर आणि ज्ञानवापी मशीद वादासंदर्भात वाराणसीमधील मे.स्थानिक न्यायालयाने पुरातत्व खात्याला सर्वेक्षणाची परवानगी दिली आहे काशी विश्वानाथ मंदिर परिसराला लागूनच असलेल्या ज्ञानवापी मशीदीच्या सर्वेक्षणाची परवानगी मेवारणासीमधील दिवाणी न्यायालयातील वरिष्ठ न्यायाधिशांनी दिली आहे यासंदर्भातील आदेश मे.न्यायालयाने जारी केल्याचं वृत्त बार अँड बेंच या कायदेविषयक वेबसाईटने दिलं आहे.

मे. वाराणसीमधील दिवाणी न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेल्या याचिकेमध्ये याचिकाकर्त्याने ज्ञानवापी मशीदीची जागा ही हिंदूंची असल्याचा दावा केलाय मुघल बादशाह औरंगजेबने १६६४ साली २००० वर्ष जुन्या काशी विश्वनाथ मंदिराचा काही भाग पाडून त्या जागी ज्ञानवापी मशीद बांधली असंही या याचिकाकर्त्याने म्हटलं आहे पुराण काळापासून येथे भगवान शंकराची स्वयंभू ज्योतिर्लिंग आहे. 

या ज्योतिर्लिंगाला विश्वेश्वर म्हणून ओळखलं जातं या भूमीवर मुस्लीमांनी आक्रमण करण्याच्या खूप आधीपासून हे मंदिर बांधण्यात आलं होतं हे मंदिर २०५० वर्षांपूर्वी राजा विक्रमादित्यने बांधल्याचं सांगितलं जातं येथे भगवान विश्वेश्वराचं मंदिर आहे धार्मिक कारणांमुळे या मंदिराचा काही भाग देशामध्ये मुस्लीम राज्य कर्त्यांची सत्ता होती तेव्हा पाडण्यात आल्याचा दावा याचिकेत करण्यात आलाय ज्ञानवापी मशीद समितीने या याचिकेला विरोध केला होता...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या