💥राज्यात लॉकडाऊन न करण्यासंदर्भात प्रकाश आंबेडकरांनी ठाकरे सरकारला केली विनंती...!


💥पुन्हा लॉकडाउन होण्याच्या भीतीने लोकांच्या मनात धस्स झालं असून लॉकडाउन न करण्याची मागणी जोर धरत आहे💥

 करोना परिस्थितीमुळे महाराष्ट्र पुन्हा एकदा लॉकडाउनच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकांना स्वयंशिस्त पाळण्याचं कळकळीचं आवाहन करतानाच लॉकडाउन करण्याचा इशारा दिला आहे त्यामुळे पुन्हा लॉकडाउन होण्याच्या भीतीने लोकांच्या मनात धस्स झालं असून लॉकडाउन न करण्याची मागणी जोर धरताना दिसत आहे याच मुद्द्यावरून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी ठाकरे सरकारला विनंती केली आहे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रात्री महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला राज्यातील करोना परिस्थितीची जाणीव करून मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना करोना नियमावलीबाबत स्वयंशिस्त पाळण्याचं आवाहन केलं राज्यातील आरोग्य व्यवस्थेवर पडणाऱ्या ताणाबद्दल कल्पना देत परिस्थिती कायम राहिली तर लॉकडाउनशिवाय पर्याय नसल्याचं ठाकरे म्हणाले मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यानंतर लॉकडाउन न करण्याची मागणी होत आहे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही ट्वीट करून सरकारला विनंती केली आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या