💥परभणी जिल्ह्यातल्या मानवत तालुक्यातील वांगीत स्थागुशाच्या पथकाची अवैध वाळू तस्करी विरोधात धाडसी कारवाई...!


💥स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या कारवाईत अवैध वाळू उपसा करणारे 2 पोकलेन,एक जेसीबीसह 5 टिप्पर,7 ट्रॅक्टर जप्त💥

परभणी (दि.५ एप्रिल) : परभणी जिल्ह्यातल्या मानवत तालुक्यातील वांगीत महसुल प्रशासन व पोलिस प्रशासनाला आव्हाण देत अवैधरित्या चोरट्या वाळूचे खुलेआम जेसीबी/पोकलेन मशीनद्वारे मोठ्या प्रमाणात उत्खनन करून या चोरट्या वाळूची वाहनांतून असंख्य तस्करी करणाऱ्या मुजोर वाळू तस्करांच्या आव्हानाला सडेतोड उत्तर देत अवैध वाळू तस्करीला लगाम लावण्याच्या दिशेने धाडसी पाऊल उचलत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वाळू तस्करांनी निर्माण केलेल्या अवैध वाळू धक्क्यावर रविवार दि.४ एप्रिल २०२१ रोजी सायंकाळी ६-०० वाजेच्या सुमारास यशस्वीपणे धाड टाकून दोन पोकलेन,जेसीबी मशीनसह सुमारे २ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्याची धाडसी कारवाई केल्याने जिल्ह्यातील अवैध वाळू तस्करांमध्ये अक्षरशः खळबळ माजली आहे.


मानवत तालुक्यातील वांगी येथे अवैध वाळू उपसा सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे धाडसी अधिकारी पोलिस उपनिरिक्षक चंद्रकांत पवार,पोलिस उपनिरिक्षक विश्वास खोले यांनी ही बाब जिल्हा पोलीस अधीक्षक जयंत मीना, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांना सांगितली. श्री. मीना यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रकांत पवार, फौजदार विश्वास खोले यांच्यासह कर्मचारी सुग्रीव केंद्रे, शंकर गायकवाड, यशवंत वाघमारे, विष्णू भिसे, अजहर पटेल, दीपक मुदीराज, अरुण कांबळे, दीपक मुंडे यांच्या पथकाने रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी छापा मारला. त्यावेळी तेथे वाळू उपसा  मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले.  पथकातील अधिकारी-  कर्मचाऱ्यांनी वाळू उपश्यासाठी वापरण्यात येत असलेले दोन पोकलेन, एक जेसीबी मशीन, पाच टिप्पर, सात ट्रॅक्टर, एक लोडर असा अंदाजे दोन कोटी रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. याबाबत मानवत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात येत असून मानवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रमेश स्वामी पुढील तपास करत आहेत....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या