💥परभणीतील कोविड सेंटर्स मधील ऑक्सीजन प्लांटला तात्काळ सुरक्षा पुरविण्याचे आदेश....!


💥नाशिक येथील ऑक्सीजन प्लांटमधील वायू गळतीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासनाने घेतला निर्णय💥

परभणी (दि.२१ एप्रिल) - जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून परभणी जिल्हा प्रशासनाच्या वतीने कोविड सेंटर्स मधून उभारलेल्या ऑक्सीजन प्लांट तसेच टँकला तात्काळ सुरक्षा पुरविण्याचे आदेश जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी आज बुधवार दि.२१ एप्रिल २०२१ रोजी सायंकाळच्या सुमारास बजावले आहेत.

नाशिक येथील ऑक्सीजन प्लांटमधील वायू गळतीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासनाने जिल्हा शासकीय रुग्णालय,आयटीआय,जिल्हा परिषद नविन इमारत या ठिकाणी उभारलेल्या ऑक्सीजन प्लांट आणि टँक यांना विशेष खबरदारी म्हणून सुरक्षा पुरविण्याकरीता एक एजन्सी नियुक्त करण्याचे आदेश बजावले असून या एजन्सी मार्फत सुरक्षा रक्षक पुरवून त्या त्या परिसरात सर्वसामान्य व्यक्तींना जावयास मनाई करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी आज बुधवारी सांयकाळी सुरक्षा पुरविण्याबाबत आदेश काढला आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या