💥शासनाचा बंदी आदेश धुडकावून नगरसेविकेच्या मुलीचा धुमधडाक्यात विवाह...!


💥मंगल कार्यालय व्यवस्थापकासह वधुपित्यावर गुन्हे💥

कल्याण: कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत करोनाने कहर केला आहे दररोजची करोना रुग्णांची आकडेवारी बाराशेच्या पुढे सरकत असल्याने रहिवाशी हादरले आहेत पालिका हद्दीत पोलीस, पालिकेकडून करोना प्रतिबंधासाठी कठोर निर्बंध लागू आहेत असे असताना कल्याण पश्चिमेतील शिवसेनेचे माजी नगरसेवक सुनील वायले आणि विद्यमान नगरसेविका शालिनी वायले यांच्या मुलीचा विवाह सोहळा एक हजार वऱ्हाडींच्या उपस्थितीत  पार पडला विवाह सोहळ्यापूर्वी महात्मा फुले पोलिसांनी मंगल कार्यालय व्यवस्थापकाला ५० वऱ्हाडींवर एकालाही  प्रवेश न देता, करोना प्रतिबंधाचे सर्व नियम पाळून विवाह सोहळा पार पाडण्याची नोटीस दिली होती. 

त्याचे अनुपालन करण्याचे आश्वासन व्यवस्थापकाने दिले होते ते पाळले न गेल्याने व्यवस्थापकासह दोन वधुपित्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे मंगल कार्यालय चालकाला तंबी दिल्याने तो करोना संसर्गाचे नियम पाळून विवाह सोहळा पार पाडण्याची जबाबदारी पार पाडील असे पोलिसांना वाटले होते महात्मा फुले पोलिसांना संशय आल्याने साहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील, हवालदार विलास शिरसाठ इतर पथक चिकणघर रस्त्यावरील भगवा तलावा जवळील भवानी मॅरेज सभागृहाजवळ विवाहाच्या दिवशी  रात्री नऊ वाजता गेले. 

तेथे दुचाकी, चारचाकी वाहनांची खूप वर्दळ असल्याचे पोलिसांच्या पथकाला दिसले त्यांनी मंगल कार्यालयात जाऊन पाहिले तर एक हजार वऱ्हाडी विवाह सोहळ्यात सहभागी झाले होते मंगल कार्यालय व्यवस्थापक रमेश लक्ष्मण सिंग याला पोलिसांनी बोलावून विचारणा केली तेव्हा मंगल कार्यालयात दोन विवाह सोहळे आहेत...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या