💥चंद्रपूर जिल्ह्यातील मोहाडी नलेश्वर येथे १०० एकर जागेत महिंद्रा क्लबचे हॉटेल सुरू होणार...!


💥यातून येथील सुमारे ४०० नागरिकांना रोजगार उपलब्ध होईल💥

चंद्रपूर जिल्हा पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे देश-विदेशातील पर्यटक येथे मोठ्या संख्येने भेट देत असतात या पार्श्वभूमीवर आता येथील मोहाडी नलेश्वार येथे महिंद्रा क्लबचेवतीने १०० एकर जागेवर पर्यटकांसाठी हॉटेल सुरू करण्यात येणार आहे यातून येथील सुमारे ४०० नागरिकांना रोजगार उपलब्ध होणार आहे कच्चेपार जंगल सफारीच्या माध्यमातून या भागाच्या नावलौकिकात भर तर पडेलच सोबतच रोजगारात देखील मोठ्या प्रमाणात वाढ होईल असे प्रतिपादन पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले आहे. 

ब्रम्हपुरी वनपरिक्षेत्रातील सिंदबोडी कच्चेपार जंगल सफारीचे उद्घाटन पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते झाले यावेळी चंद्रपूर वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक एन.आर.प्रवीण,उपवनसंरक्षक दीपेश मल्होत्रा,उपवनसंरक्षक आदिती भारद्वाज,सिंदेवाहीच्या नगराध्यक्षा आशा गंडाटे,जि.प.सदस्य रूपा सुरपाम,सहायक वनसंरक्षक रामेश्वारी भोंगाडे प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी वडेट्टीवार पुढे म्हणाले या भागातील मोहाडी नलेश्वार येथे महिंद्रा क्लबचे वतीने १०० एकर जागेवर पर्यटकांकरिता हॉटेल व्यवसाय सुरू करण्यात येणार आहे यातून येथील सुमारे ४०० नागरिकांना रोजगार उपलब्ध होईल. 

एका नामवंत अगरबत्ती कंपनीचा प्रकल्प येत असून त्याद्वारे ६०० महिलांना रोजगार प्राप्त होईल तसेच गौण वनउपजावर आधारित ४२ कोटी रुपयांचा प्रकल्प सुरू करण्यात येणार असून या सर्व कामातून जवळपास दीड हजार नागरिकांना या भागात रोजगार उपलब्ध होईल असेही त्यांनी सांगितले मुख्य वनसंरक्षक एन.आर.प्रवीण म्हणाले की,ब्रम्हपुरी वनपरिक्षेत्र हे वनसंपदा व वन्यजीवांच्या बाबतीत ताडोबापेक्षा कमी नाही..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या